जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन राष्ट्रवादीत

By Admin | Updated: February 9, 2015 23:15 IST2015-02-09T23:15:32+5:302015-02-09T23:15:32+5:30

गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व केंद्र तसेच राज्यात आपले वजन खर्च करून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणणारे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार

Former Vice President of Zilla Pancham Bisen NCP | जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन राष्ट्रवादीत

जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन राष्ट्रवादीत

गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व केंद्र तसेच राज्यात आपले वजन खर्च करून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणणारे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बिसेन यांच्यासोबतच आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील अनेक भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानीही खा.पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे नजिकच्या भविष्यात जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
खा.पटेल यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपला लोकसभा मतदार संघात अदानी, भेलसारखे हजारो कोटी रुपये किमतीचे औद्योगिक प्रकल्प आणले. धापेवाडा, बावनथडी, गोसेखुर्दसारखे सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावले. सिंचन, उद्योग व शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासोबत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पटेल यांनी केल्याने त्यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांच्या तळमळीतून जिल्ह्याला विकासाची दिशा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रफुल पटेल यांनी स्वागत करून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी पंचम बिसेन यांच्यासह राकाँत जाणाऱ्यांमध्ये सालेकसाचे माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे, माजी जि.प. सदस्य रामेश्वर पंधरे, केशवराव भुते, कृष्णा कोरे, उपसरपंच तिरथ येटरे, लिलाधर बहेकार, नरेंद्र शिवणकर, देवेंद्र मच्छिरके, जलालभाई पठाण, राजाराम शिवणकर, रविशंकर हत्तीमारे, अनिरूध्द शेंडे, गुड्डु कोरे, अंतरीक्ष बहेकार, धनराज बानेवार, रामेश्वर भांडारकर, उत्तम चर्जे, बळीराम कोरे, मादोप्रसाद मिश्रा, अब्बासभाई सय्यद, सुजीत अग्रवाल, नेमीचंद खंडाते, दिनेश नेताम, लोकेश नेताम, प्रेमलाल नेताम, देवेंद्र निज्ञनार्थी, विनोद गिरी, सुमित गिरी, दीपक वैद्य, किशोर कोहळे, नितीन मेश्राम, राहुल उके, कोमल वैद्य, राकेश नेताम, हंसराज रहिले, कुंडलिक बंसोड, जावेद खान, विक्की मस्के, शेहबाज कुरैशी आदींचा समावेश आहे.
भाजपच्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांचा झालेला भ्रमनिरास यामुळे अनेकांनी हे पाऊल उचलले आहे. प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वावर त्यांनी टाकलेला विश्वास यामुळे जिल्ह्याचा विकास घडून येईल, असा विश्वास आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रमेश ताराम, देवेंद्रनाथ चौबे, ओबीसी संगठना जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे, तालुका अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, गोपाल तिवारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Former Vice President of Zilla Pancham Bisen NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.