गोंदियाचे माजी आमदार रामरतन राऊत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 16:08 IST2020-05-04T16:06:35+5:302020-05-04T16:08:05+5:30
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे (दि.04)गोंदियातील बहेकार नर्सिग होम येथे उपचारादरम्यान निधन झाले.

गोंदियाचे माजी आमदार रामरतन राऊत यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांचे (दि.04)गोंदियातील बहेकार नर्सिग होम येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा आघात झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील आदिवासी जनतेतील मनमिळावू नेता हरपला गेला. त्यांच्या मागे पत्नी मुली असा आप्तपरिवार आहे.