माजी मुख्यमंत्री चव्हाण आज गोंदिया व तिरोडात

By Admin | Updated: January 4, 2017 00:48 IST2017-01-04T00:48:44+5:302017-01-04T00:48:44+5:30

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तसेच माजी मंत्री डॉ.नितीन राऊत

Former Chief Minister Chavan today in Gondiya and Tiroda | माजी मुख्यमंत्री चव्हाण आज गोंदिया व तिरोडात

माजी मुख्यमंत्री चव्हाण आज गोंदिया व तिरोडात

गोंदिया : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तसेच माजी मंत्री डॉ.नितीन राऊत बुधवार दि.४ जानेवारीला गोंदिया व तिरोडा येथे प्रचारसभा घेणार आहेत. गोंदियात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश ठाकूर व नगरसेवकांच्या प्रचारासाठी त्यांच्या दोन सभा होणार आहेत.
यावेळी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम (बाबा) कटरे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
पहिली सभा बुधवारी संध्याकाळी ६ वाजता गोंदिया शहरातील पुनाटोलीमधील सरस्वती शाळेच्या मैदानावर तसेच दुसरी सभा ७ वाजता गांधी पुतळा चौकात होणार आहे. त्यापूर्वी संध्याकाळी ४ वाजता चव्हाण यांची तिरोडा येथील शहर पोलीस ठाण्याजवळील नगर परिषद मैदानात जाहीर सभा होणार आहे.
या सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.के.आर. शेंडे, जि.प.सभापती पी.जी.कटरे, विमल नागपुरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई सहारे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, गोंदिया-भंडारा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, युकाँ विधानसभा अध्यक्ष संदीप रहांगडाले, डॉ.झामसिंग बघेले, राधेलाल पटले, विनोद जैन, डॉ.योगेंद्र भगत, पृथ्वीपालसिंग गुलाटी, अशोक चौधरी, नामदेव किरसान, अमर वराडे, पं.स. सभापती स्रेहा गौतम, सहेसराम कोरोटे, तिरोडा श.काँ.अध्यक्ष दिलीप असाटी, सुनील कुंभारे यांनी केले.

Web Title: Former Chief Minister Chavan today in Gondiya and Tiroda