पक्षभेद विसरून सर्वांनी आपल्या समस्या सांगाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:12+5:30

तालुक्यातील ग्राम डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे ग्राम भर्रेगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यष मेहतरलाल कोराम होते.

Forget about partisanship, everyone should point out their problems | पक्षभेद विसरून सर्वांनी आपल्या समस्या सांगाव्या

पक्षभेद विसरून सर्वांनी आपल्या समस्या सांगाव्या

Next
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : भर्रेगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : आपल्या तालुक्यात जास्त प्रमाणात आदिवासी समाज आहे. त्यांच्या समस्याही भरपूर आहेत. त्यांना मिळणाऱ्या योजना या फक्त कागदावरच ठेवून आणि त्यांची दिशाभूल काही लोक करीत आहेत. या संबंधात आदिवासी विकास प्रकल्पाची आढावा बैठक लवकरच घेणार आहो. त्याचप्रमाणे विकासाच्या दृष्टीकोनातून या विधानसभा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी पक्ष भेद विसरुन मला सांगाव्या असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे ग्राम भर्रेगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यष मेहतरलाल कोराम होते. याप्रसंगी सरपंच विद्या खोटेले, संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर धरमशहारे, संचालक संतोष खोटेले, मंसाराम उईके, गिरधारी राऊत, जगदीश बावनकर, माजी सभापती वसंत पुराम, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम काटेवार, माजी उपसरपंच रामेश्वर कुमेटी व माजी पोलीस पाटील एकनाथ बहेकार यांच्यासह भर्रेगाव परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरोटे यांनी, तालुक्यात अनेक आदिवासी संस्था आहेत. त्यांना गोडावून व वॉल कम्पाऊंडची आवश्यकता आहे. कारण एखाद्या वेळी जर पाऊस आला तर घेतलेल्या धानाची नासाडी होते. त्या नुकसानीचा भुर्दंड हा संस्थेवर बसतो. शासनाच्या विकासाप्रमाणे संबंधित विभागाशी बोलणी करुन सदर काम मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगीतले. प्रास्ताविक मांडून आभार तज्ज्ञ संचालक सुनील औरासे यांनी मानले.

Web Title: Forget about partisanship, everyone should point out their problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.