शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वनांची कत्तल, वाढत्या प्रदूषणाने पर्यावरण संकटात

By admin | Updated: June 4, 2014 23:50 IST

निसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग, वृक्षतोड व प्रदूषणात होणार्‍या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्‍हास

नरेश रहिले - गोंदियानिसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग,  वृक्षतोड व प्रदूषणात होणार्‍या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्‍हास  मानवाच्या जीवनावर बेतू लागला आहे. गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार ५४२. २८९ चौ.कि.मी. अंतरात वनजमीन आहे. यातील १७३१.८00 चौ.कि.मी. जागा प्रादेशिक वनविभागाची आहे. तर ४८३.१७२ चौ.कि.मी. वन्यजीव विभागाच्या अंतर्गत आहे. तर ३२७.३१७ चौ.कि.मी. वन हे वनविकास महामंडळाच्या अंतर्गत आहे. निसर्ग सृष्टीने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांचे माळरानात रुपांतर होत आहे. वनमाफियांकडून सर्रासपणे जंगल तोड होत आहे. या वृक्षतोडीला काही वनाधिकार्‍यांचेही सहकार्य आहे. होणार्‍या वृक्षकटाईमुळे निसर्गाचा लहरीपणा दिसू लागला आहे. पाण्याचे  स्त्रोत कमी होत असल्याचे जाणवते. पर्यावरण प्रदुषणात वाढ करणारे मोठे माध्यम म्हणजे जिल्ह्यातील राईस मिल व मोठय़ा प्रमाणात असलेल्या वाहनांची संख्या आहे. राईस मिलमधून बाहेर टाकण्यात येणारा धूर लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचविणारा आहे. शहराच्या ठिकाणी राईस मिल राहू नये असे नियम असताना देखील शहरी भागातच अनेक व्यापार्‍यांच्या राईस मिल राजरोसपणे सुरू आहेत. राईस मिल मालकांनी निघणार्‍या धूराला आटोक्यात आणण्यासाठी मिल परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. परंतु एकही राईस मिल मालक वृक्षारोपण करताना दिसत नाही. पर्यावरणाच्या र्‍हासासाठी माणूसच जबाबदार असून वनविभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात यावर्षी जंगलात आगीच्या ६३ घटना घडल्या. यात १५४.१0 हेक्टर वनपरिसरात आग लागली. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाले. परंतु वनविभाग कवडीचेही नुकसान झाले नाही असे म्हणते. म्हणजे ६३ आगिच्या घटनांची नोंद झाली मात्र आगीत कवडीचीही संपती जळाली नाही ही आश्‍चर्याची बाब आहे. जेव्हा कुंपणच शेत खाते ही स्थिती गोंदिया जिल्ह्याच्या वनविभागाची झाली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र पर्यावरण संकटात सापडत आहे.