वनांची कत्तल, वाढत्या प्रदूषणाने पर्यावरण संकटात
By Admin | Updated: June 4, 2014 23:50 IST2014-06-04T23:50:30+5:302014-06-04T23:50:30+5:30
निसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग, वृक्षतोड व प्रदूषणात होणार्या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्हास

वनांची कत्तल, वाढत्या प्रदूषणाने पर्यावरण संकटात
नरेश रहिले - गोंदिया
निसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग, वृक्षतोड व प्रदूषणात होणार्या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्हास मानवाच्या जीवनावर बेतू लागला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार ५४२. २८९ चौ.कि.मी. अंतरात वनजमीन आहे. यातील १७३१.८00 चौ.कि.मी. जागा प्रादेशिक वनविभागाची आहे. तर ४८३.१७२ चौ.कि.मी. वन्यजीव विभागाच्या अंतर्गत आहे. तर ३२७.३१७ चौ.कि.मी. वन हे वनविकास महामंडळाच्या अंतर्गत आहे. निसर्ग सृष्टीने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांचे माळरानात रुपांतर होत आहे. वनमाफियांकडून सर्रासपणे जंगल तोड होत आहे. या वृक्षतोडीला काही वनाधिकार्यांचेही सहकार्य आहे. होणार्या वृक्षकटाईमुळे निसर्गाचा लहरीपणा दिसू लागला आहे. पाण्याचे स्त्रोत कमी होत असल्याचे जाणवते.
पर्यावरण प्रदुषणात वाढ करणारे मोठे माध्यम म्हणजे जिल्ह्यातील राईस मिल व मोठय़ा प्रमाणात असलेल्या वाहनांची संख्या आहे. राईस मिलमधून बाहेर टाकण्यात येणारा धूर लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचविणारा आहे. शहराच्या ठिकाणी राईस मिल राहू नये असे नियम असताना देखील शहरी भागातच अनेक व्यापार्यांच्या राईस मिल राजरोसपणे सुरू आहेत. राईस मिल मालकांनी निघणार्या धूराला आटोक्यात आणण्यासाठी मिल परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. परंतु एकही राईस मिल मालक वृक्षारोपण करताना दिसत नाही.
पर्यावरणाच्या र्हासासाठी माणूसच जबाबदार असून वनविभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात यावर्षी जंगलात आगीच्या ६३ घटना घडल्या. यात १५४.१0 हेक्टर वनपरिसरात आग लागली. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाले. परंतु वनविभाग कवडीचेही नुकसान झाले नाही असे म्हणते. म्हणजे ६३ आगिच्या घटनांची नोंद झाली मात्र आगीत कवडीचीही संपती जळाली नाही ही आश्चर्याची बाब आहे. जेव्हा कुंपणच शेत खाते ही स्थिती गोंदिया जिल्ह्याच्या वनविभागाची झाली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र पर्यावरण संकटात सापडत आहे.