वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:29+5:302021-01-13T05:16:29+5:30

किसान सन्मान योजनेपासून वंचित नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार ...

Forest department neglects deforestation | वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

किसान सन्मान योजनेपासून वंचित

नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाला. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळाला नाही.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा

तिरोडा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

रानडुकरांच्या हैदोसाने पिकाचे नुकसान

गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांंतर्गत साझा क्रमांक-२६ मध्ये रानडुकरांनी हैदोस मांडला असून त्यामुळे धान पीक जमीनदोस्त झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीस समोर जाऊन ५० टक्के धानपीक वाचविले. परंतु रानडुकरांनी तेही पीक नासधूस करून जमीनदोस्त केले. रानडुकर मारण्यावर बंदी असल्याने दिवसेंदिवस रानडुकरांच्या संख्येत वाढ होत आहे.

अनुदानाचे वाटप करण्याची मागणी

केशोरी : गेल्या सहा-सात महिन्यापासून वयोवृद्ध निराधारांंना अद्यापही बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्येष्ठ वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार असलेल्या लोकांना उपजीविका चालविण्यासाठी शासनाकडून संजय गांधी, श्रावण बाळ पेन्शन योजना कार्यान्वित करून दरमहा एक हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. परंतु गेल्या सहा-सात महिन्यापासून सदर योजनेचे अनुदान जमा न झाल्यामुळे दररोज बँकेमध्ये जाऊन अनुदान जमा झाले किंवा नाही यासंबधी चौकशी करीत आहेत.

Web Title: Forest department neglects deforestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.