अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

By Admin | Updated: May 17, 2017 00:21 IST2017-05-17T00:21:22+5:302017-05-17T00:21:22+5:30

जिल्हा पोलिसांनी सोमवारी विविध ठिकाणी अवैध दारु विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई केली.

The forage on illicit liquor dealers | अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

जिल्हा पोलिसांची कारवाई : मुद्देमालासह अनेकांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी सोमवारी विविध ठिकाणी अवैध दारु विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई केली. संजय नगरातील ईमरोज फिरोज सैय्यद (१९) याने एका मोटार सायकलवर ६ नग इलायची देशी दारु, ६ नग बडी सेफ, ४८ नग टेंगो पंच, २४ नग फिरकी संत्री दारु वाहून नेत असताना त्याला गोंदिया ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढोके यांनी अटक केली.
सदर आरोपी जवळून ४४ हजार ६२० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोगर्रा येथील चरणदास दाजीराव नागपुरे (४२) याच्याकडून ५ लिटर मोहफुलाची दारु, लोधीटोला येथील शशीकला गणेश दानवे (४५) या महिलेकडून १५ नग देशी दारुचे पव्वे, नवेगाव येथील सत्यवान नागो मोहनकर (३२) याच्याकडून ४ नग देशी दारुचे पव्वे, विहिरगाव येथील रमेश रामचंद आसलवार (३६) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे, रावणवाडी येथील राजकुमार मदनलाल हरिणखेडे (३८) याच्याकडून इम्पेरीयल ब्लूचे ९ पव्वे, मेगॅडाल नंबर वनचे ४ पव्वे, रॉयल स्टॅगचे ३ पव्वे, टुको बिअरची एक बॉटल असा एकूण ३ हजार ७५ रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर आरोपीविंरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The forage on illicit liquor dealers