नारीशक्तीचे देशाला मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:03 IST2017-08-26T21:03:08+5:302017-08-26T21:03:22+5:30
देशातील बहुजन समाजातील महिलांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. राणी अवंतीबाई लोधील राणी दुर्गावती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठेच योगदान आहे.

नारीशक्तीचे देशाला मोठे योगदान
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपुरी : देशातील बहुजन समाजातील महिलांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. राणी अवंतीबाई लोधील राणी दुर्गावती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठेच योगदान आहे. नारी शक्तीचा सन्मानच या विरांगणांचा सन्मान आहे, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
शहीद विरांगना अवंतीबाई लोधी यांच्या १८७ व्या जयंती कार्यक्रमाची सुरूवात मोटारसायकल रॅलीने करण्यात आली. यात शेकडोंच्या संख्येने दुचाकीस्वारांचा समावेश होता. यानंतर नारी सन्मान कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
नारी सन्मान कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उद्घाटन खा. नाना पटोले यांच्या हस्ते, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी डॉ. आशा उपवंशी, गौरी राकेश उपवंशी, जि.प. सदस्य कुंदन कटारे, अॅड. हेमलता पतेहै, लक्ष्मी आतिश लिल्हारे, बंटी पंचबुद्धे, दीपक बोबडे, सुनील केलंका, भाऊराव उके, रूपचंद ठकरेले, चतुर्भूज नागपुरे, डॉ. रणगिरे, महेंद्र बघेले, सौरभ लिल्हारे, द्रोण लिल्हारे, संजू मस्खरे, सुनील लिल्हारे, शिवराम सवालाखे, रामेश्वर लिल्हारे, सोनू चंद्रवंशी, हर्षल पवार उपस्थित होते.
नारी सन्मान कार्यक्रमात ६० पेक्षा अधिकारी महिलांचा सत्कार करण्यात आला. यात विद्यापीठ टॉपर, राज्यस्तरीय खेळाडू, एयर होस्टेस, शासकीय व खासगी नोकरी करणाºया महिलांचा समावेश आहे. त्यांना अवंतीबाई यांच्या गौरवशाली इतिहासाची पुस्तिका, प्रमाणपत्र व नारी सन्मानाचा दुपट्टा भेट देण्यात आला.
सदर रॅली शहरातून ग्रामीण क्षेत्रात नेण्यात आली. हिवरा येथे अवंती चौकाचे निर्माण करण्यात आले. ढाकणी येथे अवंतीबाईच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले लोधीटोला-चुटिया येथे अवंतीबाईच्या पुतळ्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी भूमिचे दान नानी दमाहे यांनी दिले. पुतळा निर्माणाची जबाबदारी लोधी युवा संघटनेने उचलली.
लोधीटोलावरून सदर रॅली कारंजा येथे गेली. तेथे रिंग रोड व कोहमारा रोडाच्या टी पॉर्इंटवर स्थापित अवंती चौकात पूजा करण्यात आली. कारंजा येथे पायदळ रॅली फिरविण्यात आली.
यानंतर सदर रॅली केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचली. येथे लोधी जमीनदार स्व. कुंवर तिलकसिंह नागपुरे यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले.