जिल्ह्यातील समस्या त्वरित सोडवा
By Admin | Updated: March 16, 2015 00:09 IST2015-03-16T00:09:16+5:302015-03-16T00:09:16+5:30
जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांची त्वरित सोडवणूक करावी, अशी मागणी करीत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या सोबत चर्चा केली.

जिल्ह्यातील समस्या त्वरित सोडवा
गोंदिया : जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांची त्वरित सोडवणूक करावी, अशी मागणी करीत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या सोबत चर्चा केली.
या चर्चेत, आमदार अग्रवाल यांनी तालुक्यातील चिरामणटोला या गावाला परसवाडा, कटंगटोला व झिलमीली या गावांपासून वेगळे करून स्वतंत्र गावाची स्थापना करण्याबाबत विशेष प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तर सन २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुमारे ७० लाख रूपयांचा निधी लवकरात लवकर तहसीलदारांना उपलब्ध करवून वितरित करण्याचीही मागणी केली.
या सोबतच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करावे, तालुक्यातील झुडपी जंगलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, शहरातील प्रलंबीत नझूल पट्यांचे नवीनीकरण, नगरपरिषदद्वारा बीआरजीएफ व वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्रस्तावीत पथदिव्यांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देणे, शहरातील नवीन उड्डाण पूल निर्माणाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली नगरपरिषद बाग व प्रताप क्लबच्या जागेच्या भरपाईच्या प्रस्तावाला मंजुरी देणे, सिव्हील लाईन्स हनुमान चौकात समाज भवनाची जागा नगरपरिषदेला उपलब्ध करावी, जीएनएम व एएनएम नर्सिंग कॉलेजची जागा निश्चित करावी, जिल्हा क्रिडा संकूलच्या जागेचा वाद सोडवावा तसेच अतिरिक्त आंतरिक सुधार मंजूर करणे, शहरातील प्रलंबित घरकुलांची यादी मंजूर करने यासहीत अन्य मुख्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर आयुक्त अनुपकु मार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित बोलावून योग्य कारवाईचे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)