बलात्कारी तरुणाला पाच वर्षांचा कारावास

By Admin | Updated: August 23, 2016 23:58 IST2016-08-23T23:58:17+5:302016-08-23T23:58:17+5:30

अर्जुनी मोरगावच्या सिंगलटोली येथील चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावास

Five years imprisonment for rapist youth | बलात्कारी तरुणाला पाच वर्षांचा कारावास

बलात्कारी तरुणाला पाच वर्षांचा कारावास

गोंदिया : अर्जुनी मोरगावच्या सिंगलटोली येथील चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.
दिनेश भीका नंदेश्वर (२१)रा.सिंगलटोली अर्जुनी मोरगाव असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात अशोक सखाराम भाग्यवंत (५५) यांनी प्रकरण मॅनेज करण्यासाठी देवाणघेवाण करण्याची भाषा वापरली, असा आरोप पोलिसांकडे केला होता. परंतु या प्रकरणात अशोक भाग्यवंत यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे.
७ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी दिनेश नंदेश्वरने ४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी केला. या प्रकरणावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. त्रिवेदी यांनी सुनावणी केली. या प्रकरणात आरोपी दिनेशला कलम ९ एम (१०) बाललैगिंक अत्याचार अधिनियमांतर्गत ५ वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.
सरकारी वकील म्हणून सुजाता तिवारी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएस सेलच्या महिला पोलिस शिपाई आशा मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five years imprisonment for rapist youth