पाच महिन्यात पाच पोलीस निलंबित

By Admin | Updated: July 19, 2014 01:27 IST2014-07-19T01:27:47+5:302014-07-19T01:27:47+5:30

पोलीस विभागात काम करताना गैरकायदेशिर

Five police suspend five months | पाच महिन्यात पाच पोलीस निलंबित

पाच महिन्यात पाच पोलीस निलंबित

गोंदिया : पोलीस विभागात काम करताना गैरकायदेशिर काम करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना मार्च ते जुलै या काळात निलंबित करण्यात आले आहे. कायद्याचे पालन करण्यासाठी असलेले पोलिस कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही निलंबनाची पाळी येते हे जिल्हा पोलीस प्रशासनाने यातून दाखवून दिले आहे.
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतील पोलीस शिपाई महिपालसिंह भुवनसिंह सोलंकी ब.नं.२०२१ याला लाच घेतांना पकडल्यामुळे ९ जुलै रोजी पोलीस अधिक्षकांनी निलंबित केले. आमगाव पोलीस ठाण्यात पोलीस नायक म्हणून कार्यरत असलेले रहुश हफीज पठाण ब.नं.१०९२ यांनी एका जुगाराच्या प्रकरणात पकडलेली मोटारसायकल देण्यासाठी २ हजार रूपयाची मागणी केली होती. त्यात ९०० रूपये घेताना रहुफला पकडल्याने त्याला १४ जुलै रोजी निलंबित करण्यात आले. दवनीवाडा पोलीस ठण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई शिवपूजनसिंग सुरजनाथसिंग बैस ब.नं.१५९० याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे त्याला २१ मार्च रोजी निलंबित करण्यात आले. घटनेपासून बलात्कारी पोलीस शिपाई फरार होता. याची माहिती त्याचा भाऊ रामसिंग सुरजनाथसिंग बैस ब.नं.१४६३ याला होती. तो दररोज आपल्या भावासोबत फोनवर बोलत होता. रामसिंग हा गोंदियाच्या पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. परंतु त्यने आपल्या बलात्करी भावाची माहिती पोलिसांना न देता लपविली. ही माहिती पोलिसांना एसडीअर/सीडीआर यातून मिळाली. त्यानंतर त्याने सीआरपीसी १६० चा नोटीस फाडल्यामुळे त्याला ५ जुलै रोजी निलंबित करण्यात आले.
नवेगावबांध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने आपल्या अधिकाऱ्याला आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे.विलास मस्के ब.नं.१६४७ असे त्याचे नाव आहे. त्याची नोकरी लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद येथे लावल्यावर तिथे पठवू नका अन्यथा आत्महत्या करील अशी धमकी विलास मस्के याने आपल्या ठाणेदाराला दिली होती. परिणामी त्याला ३ जून रोजी निलंबित करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five police suspend five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.