पाचशे एकर शेती सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST2020-03-08T05:00:00+5:302020-03-08T05:00:09+5:30

तलावाच्या नहर व पाणी जाण्याची गेटची दुरूस्ती अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे तलावात पाणी साचून राहत नसल्याने शेतकºयांना या तलावाचा सिंचनासाठी कसलाच उपयोग होत नाही. परिणामी शेतकºयांना रब्बी पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

Five hundred acres of agricultural land deprived of irrigation | पाचशे एकर शेती सिंचनापासून वंचित

पाचशे एकर शेती सिंचनापासून वंचित

ठळक मुद्देतलावाचे गेट दुरूस्तीकडे दुर्लक्ष। लघु पाटबंधारे विभागाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील कोयलारी गावाजवळील गट क्रमांक २३० येथील मामा तलावाचे काम अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे रखडले आहे. परिणामी शेतकऱ्यांना या तलावापासून सिंचन होण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
या तलावाच्या नहर व पाणी जाण्याची गेटची दुरूस्ती अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे तलावात पाणी साचून राहत नसल्याने शेतकºयांना या तलावाचा सिंचनासाठी कसलाच उपयोग होत नाही. परिणामी शेतकºयांना रब्बी पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
या तलावाचे गेट व नहराचे काम पूर्ण केल्यास कोयलारी गावातील जवळपास ५०० एकर शेतीला सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे कोयलारी येथील शेतकºयांनी वांरवार लघु पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन या तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी केली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. परिणामी शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे.

Web Title: Five hundred acres of agricultural land deprived of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.