शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

२६ जूनलाच वाजणार शाळेची पहिली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

शैक्षणिक सत्रात कशा पद्धतीने शाळा सुरू करण्यात येतील यासंदर्भात माहिती सरकार देणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळा सुरू करताना त्या-त्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण किती आहेत, याची माहिती मुख्याध्यापकाला ठेवण्यास सांगितली आहे. शाळा व्यवस्थापन समिती ८ ते १० जूनच्या दरम्यान बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देपालकांची चिंता वाढली, कोरोनाचे संकट असताना शाळा सुरु करण्याचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी २६ जून रोजी शाळा सुरू होतात. परंतु यंदा कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे निश्चित वेळेवर शाळा सुरू होणार किंवा नाही, यासंदर्भात पालकांमध्ये संभ्रम होता. परंतु हा संभ्रम आता दूर झाला आहे. कोरोना संसर्ग असतानाही २६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पी.एम.कचवे यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरू करण्यासंदर्भात माहिती मागितली आहे.त्यांनी पाठविलेल्या पत्रात ४ जून रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सचा दाखला देत २६ जून पासून शाळा सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्याचे म्हटले आहे. या शैक्षणिक सत्रात कशा पद्धतीने शाळा सुरू करण्यात येतील यासंदर्भात माहिती सरकार देणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळा सुरू करताना त्या-त्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण किती आहेत, याची माहिती मुख्याध्यापकाला ठेवण्यास सांगितली आहे. शाळा व्यवस्थापन समिती ८ ते १० जूनच्या दरम्यान बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे सांगितले आहे. कोरोना संसर्गाला लक्षात घेऊन शिक्षकांना ज्या गावात शाळा आहेत त्याच गावी राहणे अत्यावश्यक केले आहे. शाळेत सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन करून आपल्या शाळेचे स्वतंत्र नियोजन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ११ जूनपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे पत्रात म्हटले आहे.सम विषम पद्धतीने लागणार शाळाएखाद्या वर्गात विद्यार्थी संख्या अधिक असेल तर त्यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी सम-विषम पद्धतीने वर्ग घेतले जाणार आहेत. म्हणजेच ५० टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी तर ५० टक्के विद्यार्थी दुसºया दिवशी शाळेत उपस्थित राहतील.५० टक्के घरी राहणाºया बालकांना आॅनलाईन पद्धतीने होमवर्कदिला जाणार आहे.विद्यार्थ्यांची घेतली जाणार काळजीकोरोना विषाणूचा संसर्ग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता, हँडवॉश सुविधाचा वापर, सॅनिटाईज, शालेय पोषण आहार वितरणाचे नियोजन, शाळेची बस व सुरक्षित अंतर याचे तंतोतंत पालन व्हावे. शक्यतोवर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या.एक दिवस सोडून शाळाशाळेत सुरक्षित अंतर ठेवणे,विद्यार्थ्यांची उपस्थिती,शिक्षक संख्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेत एक दिवस वगळून शाळा भरविण्यात येईल. म्हणजेच ८ तारखेला वर्ग घेतला तर ९ तारखेला सुट्टी राहिल. याप्रकारे सर्व वर्गाचे क्र म सुरू राहतील. एक दिवस शाळा सोडून रविवारला शाळेत बोलाविले जाईल,यासंदर्भातही माहिती मागविण्यात आली आहे. शनिवारला अर्धा दिवस चालणारी शाळा पूर्ण दिवस सुरू राहील.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी