कुरव चोचीचा सुरय पक्ष्याची जिल्ह्यात प्रथम नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:56+5:302021-01-13T05:16:56+5:30

अर्जुनी मोरगाव : दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे तालुक्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. त्यामुळे ही पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. यंदा ...

The first recorded bird of the sun in the district | कुरव चोचीचा सुरय पक्ष्याची जिल्ह्यात प्रथम नोंद

कुरव चोचीचा सुरय पक्ष्याची जिल्ह्यात प्रथम नोंद

अर्जुनी मोरगाव : दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे तालुक्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. त्यामुळे ही पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. यंदा कुरव चोचीचा सुरय हा पाणपक्षी आढळला. हे पक्षी माेठ्या प्रमाणात तालुक्यातील जलाशयांवर सध्या दिसून येत असल्याने, पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अर्जुनी मोरगाव परिसरात स्थलांतरित पक्षी सध्या मोठ्या संख्येत दिसत आहेत. नदी सुरय वर्षभर या परिसरामध्ये दिसत नाही, परंतु एवढ्यात मोठ्या संख्येत यंदा प्रथमच पाहायला मिळाला. या नदी सुरयच्या थव्यांमध्ये कुरव चोचीचा सुरय हा साधारण कमीपणे दिसणारा पक्षी दिसल्याने, पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कुरव चोचीचा सुरय हा हिवाळी स्थलांतरित पक्षी असून, याची खूप कमी नोंद अर्जुनी मोरगाव परिसरात झाली आहे. हा पक्षी खूप कमी वेळा पाहिला असल्याचे पक्षीमित्र डॉ.शरद मेश्राम आणि प्रा.अजय राऊत यांनी सांगितले. हा पक्षी एक दोनच्याच संख्येत असतो. अर्जुनी मोरगाव परिसरात हा दोनच्या संख्येत दिसून आला. इतर सुरय पक्षी आणि कुरव चोचीचा सुरय या पक्ष्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक म्हणजे, कुरवची चोच आणि पाय दोन्ही काळ्या रंगाचे असतात. हिवाळ्यामध्ये याचा पूर्ण रंग हा पांढरा असून, शेपटीचे टोक किंचित करड्या रंगाचे असते. पंखांवर किंचित करड्या रंगाची झाग असते, परंतु प्रजोत्पादनाच्या काळात याच्या रंगात थोडा बदल होतो. साधारणपणे उन्हाळ्याच्या काळात प्रजोत्पादनाच्या वेळी डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातल्यासारखा हा पक्षी दिसतो. चोच आणि पाय काळेच असतात. हिवाळ्यात संपूर्ण भारतभर दिसतो. विशेषतः स्थलांतरित इतर सुरय म्हणजे नदी सुरय यांच्यासोबत हा एक दोन किंवा विखुरलेल्या संख्येत दिसतो.

.....

संसाराची धुरा दोघांवरही

सुरय पक्षी यातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. हा जमिनीवर बसलेला कमी मात्र हवेत घिरट्या घालताना जास्त दिसतो. याची शेपूट खोलवर दुभंगलेली असते. याला विणीच्या काळात कंठ फुटतो. याचा विणीचा हंगाम एप्रिल ते जून अखेरपर्यंत असतो. नदी, तलावाच्या बेटावर घरटी करतात. याची घरटी म्हणजे माती किंवा रेतीला आजूबाजूला करून तेथे कचऱ्याची किनार लावलेली असते. एका वेळी २ ते ३ अंडी हे पक्षी घालतात. नर आणि मादी दोघेही मिळून संसाराची संपूर्ण जबाबदारी पार पाडतात.

....

हिवाळ्यात रंग होता पांढरा

कुरव चोचीचा सुरय या पक्ष्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक म्हणजे, कुरवची चोच आणि पाय दोन्ही काळ्या रंगाचे असतात. हिवाळ्यामध्ये याचा पूर्ण रंग हा पांढरा असून, शेपटीचे टोक किंचित करड्या रंगाचे असते. पंखांवर किंचित करड्या रंगाची झाग असते.

Web Title: The first recorded bird of the sun in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.