Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात आढळला पहिला कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 10:10 IST2020-03-27T10:10:06+5:302020-03-27T10:10:31+5:30
गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलाआहे. त्याच्यावर केलेल्या तपासणीच्या अहवालानंतर जिल्हा आरोग्य विभागाने शुक्रवारी सकाळी याला दुजोरा दिला आहे.

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात आढळला पहिला कोरोनाबाधित रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलाआहे. त्याच्यावर केलेल्या तपासणीच्या अहवालानंतर जिल्हा आरोग्य विभागाने शुक्रवारी सकाळी याला दुजोरा दिला आहे. सदर बाधित रुग्ण काही दिवसांपूर्वीच बँकॉक येथून आला होता असे कळते. या रुग्णानंतर विदर्भातील रुग्णांची संख्या १४ झाली आहे.
कोरोनापासून संरक्षण मिळावे म्हणून शासनपातळीवर शर्थीचे प्रयत्न होत आहेत. नागरिकांच्या मनातही कोरोनाबाबत पुरेशी जागरुकता व धास्ती आली आहे. तथापि, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते आहे. तर दुसरीकडे नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण हा बरा होऊन घरी परतला असल्याचेही आशादायक चित्र आहे.