आगीत घर भस्मसात
By Admin | Updated: April 19, 2017 00:12 IST2017-04-19T00:12:39+5:302017-04-19T00:12:39+5:30
येथील अशोक सुका राऊत यांच्या घराला अचानक आग लागल्याने आगीत त्यांचे घर भस्मसात झाले.

आगीत घर भस्मसात
परिवार उघड्यावर : सुमारे १.२७ हजारांचे नुकसान
सौंदड : येथील अशोक सुका राऊत यांच्या घराला अचानक आग लागल्याने आगीत त्यांचे घर भस्मसात झाले. सोमवारी (दि.१७) रात्री ११ वाजतादरम्यान लागलेल्या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसून राऊत यांचे सुमारे एक लाख २७ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
रात्री ११ वाजता आग लागल्याने खबळळ उडाली मात्र जवळील शेजाऱ्यांच्या घरी लग्नाचे जेवन चालू असल्याने परिवारातील सदस्य बचावले. तसेच परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत टी.व्ही, कपडे, पलंग व इतर साहित्य जळून खाक झाले.
घरातील सर्व साहित्य जळाल्याने राऊत यांचा परिवार उघड्यावर आला आहे. तलाठी उमराव वाघधरे व सचिन ढोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी राऊत यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)