चोरीचे मुरूम वापरणाऱ्या कंपनीला दोन कोटीचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:34+5:30
गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नियोजन शून्य केले जात आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात चोरीचे मुरूम वापरण्यात आल्याचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत जिल्हा प्रशासनाने या कंपनीवर दोन कोटी रूपयांचा दंड आकारला आहे.

चोरीचे मुरूम वापरणाऱ्या कंपनीला दोन कोटीचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नियोजन शून्य केले जात आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात चोरीचे मुरूम वापरण्यात आल्याचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत जिल्हा प्रशासनाने या कंपनीवर दोन कोटी रूपयांचा दंड आकारला आहे.
देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. हे काम करताना देवरीपासून आमगावपर्यंच्या रस्त्यात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.
रस्ता तयार करताना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकट माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. परिणामी वाहन चालकांचा अपघात होतो. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाऊस आल्याने आमगावच्या नाबार्ड बोर्डपासून धम्मगीरी या एक किमीच्या अंतरावर सायंकाळी ७ वाजतापासून १ जानेवारी २०२० च्या सकाळी ९ वाजता या १४ तासाच्या कालावधीत २० पेक्षा अधिक वाहन चालक पडले होते. या महामार्गाचे बांधकाम करताना वाटसरूंची येण्या-जाण्याचा रस्ता सोयीस्कर करूनच बांधकाम करणे अपेक्षीत होते. परंतु तसे होत नसल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ हजार ब्रास मुरूम तलावातून काढण्याची मंजुरी दिली आहे. परंतु या रस्त्यावर वापरण्यात येणारे मुरूम तलावातील नाहीत.तलाव खोलीकरण करून त्यातील मुरूम या ठिकाणी वापराव्यात अश्या जिल्हाधिकाºयांच्या सूचना होत्या. परंतु तसे न करता भलत्याच ठिकाणी खोदकाम करून मुरूम आणले जात आहे.
२५ हजार ब्रास मुरूम वापरण्याची मंजुरी देण्यात आली. परंतु या ठिकाणी वापरण्यात आलेले मुरूम लाखो ब्रासच्या घरात आहे असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते.
याची दखल घेत देवरी येथील तहसीलदार विजय बोरूडे यांनी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणाºया एम.बी.पाटील कन्सट्रक्शन कंपनी लि. पुणे मार्फत गौरव गुप्ता रा. देवरी यांना १ कोटी ९९ लाख २ हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे.
५० हजार ब्रास मुरूमाचे विना परवाना उत्खनन
देवरी तालुक्याच्या देवाटोला तलाठी सा.क्र.०५ हरदोली येथील गट क्र.२७७ आराजी १.७६ हे. आर. जागेमधून सन २०१८-१९ ते सन २०१९-२० या कालावधीसाठी १४ हजार ७०० ब्रास गिट्टी दगड उत्खनन करून वाहतूक करण्याचे परवाने काढले होते. मंडळ अधिकारी मुल्ला व तलाठी हरदोली यांनी १० जानेवारी रोजी तयार केलेल्या अहवालानुसार गट क्र. २७७ आराजी १.७६ हे. आर.जागेमधील उत्खनन १ लाख ८२ हजार ४०९ घन मीटर एवढे मुरूम काढले. ४९ हजार ७५५ ब्रास मुरूम विना परवनागीने काढल्याने त्यांच्यावर १ कोटी ९९ लाख २ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.
३० दिवसात दंड न भरल्यास दंड होणार १२ कोटी
४एम.बी.पाटील कन्सट्रक्शन कंपनी लि.पुणे मार्फत गौरव गुप्ता रा.देवरी यांना १ कोटी ९९ लाख २ हजार रूपयाचा दंड १४ जानेवारी २०२० ला ठोठावला आहे. हा दंड ३० दिवसाच्या आत न भरल्यास या कंपनीला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये, बाजारभाव मुल्य दर स्वामीत्वधनाचे पाच पट दंड व स्वामीत्वधनाचे ४०० रूपये प्रतीब्रास असे एकूण ११ कोटी ९४ लाख १२ हजार रूपये भरावे लागतील.