सकारात्मक विचार बाळगून यश प्राप्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:50+5:30
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या समोर मोठा उद्देश ठरवून व स्वत:ला शिस्त लावून स्वत:शी कटिबद्ध असण अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक विचार बाळगून यश प्राप्त करा असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी यापदाकरिता निवड झालेले मिथून तरोणे यांनी केले.

सकारात्मक विचार बाळगून यश प्राप्त करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या समोर मोठा उद्देश ठरवून व स्वत:ला शिस्त लावून स्वत:शी कटिबद्ध असण अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक विचार बाळगून यश प्राप्त करा असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी यापदाकरिता निवड झालेले मिथून तरोणे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम पळसगाव-राका येथील आरंभ फाउंडेशन इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष प्रमानंद रंगारी यांच्या पुढाकरने ग्राम चिखली येथील रत्नदीप विद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पुस्तक वितरण कार्यक्र मात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संचालक तथा सेवानिवृत मुख्याध्यापक पी. के. सुखदेवे होते. पुस्तक वितरक म्हणून फाउंडेशनच्या आधारस्तंभ शकुंतला रंगारी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एल. एम. पतोडे, शिक्षक व्ही. एल. जनबंधू, समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक एल. बी. राउत उपस्थित होते.
याप्रसंगी तरोणे यांनी, विधार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके व वर्तमान पत्रे वाचावित, स्मार्टस्टडी कशी करावी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परिक्षेविषयी विधार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
दरम्यान, फाउंडेशनच्यावतीने तरोणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पाहुण्यांच्या हस्ते एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, एसएससी, नेट, टीईटी, कृषी आदि स्पर्धा परिक्षांची तयारी करणाºया १५ विधार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी फाउंडेशनचे संचालक सुखदेवे व मुख्याध्यापक पतोडे यांनी विधार्थ्यांना मार्गदर्शन केले.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमानंद रंगारी हे अमेरिकेत स्थायी झाले असून ते भरतातील गरीब, गरजू मुलांसाठी एक मदत कार्य म्हणून फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक सामाजिक उपक्र म राबवित असल्याची माहिती प्रास्ताविकेतून प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम यांनी दिली. संचालन करून आभार प्रकल्प समन्वयक आर.व्ही.मेश्राम यांनी मानले.