अखेर ‘त्या’ आरोपीला अटक

By Admin | Updated: February 18, 2017 01:03 IST2017-02-18T01:03:54+5:302017-02-18T01:03:54+5:30

येथील पुनाटोली भागातील सलून व्यावसायिक राधेश्याम नत्थुलाल लांजेवार (४०) यांना

Finally, the accused was arrested | अखेर ‘त्या’ आरोपीला अटक

अखेर ‘त्या’ आरोपीला अटक

बंद यशस्वी : सलून व्यावसायिकावरील हल्ला प्रकरण
गोंदिया : येथील पुनाटोली भागातील सलून व्यावसायिक राधेश्याम नत्थुलाल लांजेवार (४०) यांना त्यांच्याच सलूनमध्ये जाऊन पुनाटोली रहिवासी अतुल कैलास कागदे याने वस्तराब्लेडने मारुन गंभीर जखमी केले होते. यासंदर्भात १५ फेबु्रवारीला नाभिक संघटनेने एकता दाखवत पाळलेल्या बंदनंतर अखेर पोलिसांनी आरोपीस अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, ६ फेबु्रवारीला सायंकाळी ४ वाजता लांजेवार हे पुनाटोली भागातील आपल्या दुकानात असताना आरोपी अतुल कागदे याने नशेत येऊन आधी माझी दाढी कटींग करुन दे, असा तगादा लावला. मात्र आधीचे ३-४ ग्राहक बसलेले असल्याने लांजेवार यांनी थांबायला सांगितले. यावर कागदे याने सलूनमधील वस्तराब्लेडने वार करुन राधेश्याम लांजेवार यांना गंभीर जखमी केले. त्या निषेधार्थ १६ फेबु्रवारीला गोंदिया जिल्हा नाभिक समाज संघटनेने त्या आरोपीला अटक करण्याची मागणी करीत जिल्ह्यातील सर्व सलून बंद ठेवले होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Finally, the accused was arrested