अंताक्षरी स्पर्धेची आॅडिशन फेरी पूर्ण

By Admin | Updated: July 28, 2014 23:37 IST2014-07-28T23:37:15+5:302014-07-28T23:37:15+5:30

लोकमत सखी मंचद्वारे २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता स्थानिक भवभूती रंगमंदिरात अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांची आॅडिशन फेरी २६ जुलै रोजी

Finalize the audition round of Antakshari tournament | अंताक्षरी स्पर्धेची आॅडिशन फेरी पूर्ण

अंताक्षरी स्पर्धेची आॅडिशन फेरी पूर्ण

गोंदिया : लोकमत सखी मंचद्वारे २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता स्थानिक भवभूती रंगमंदिरात अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांची आॅडिशन फेरी २६ जुलै रोजी स्थानिक सुभाष बगिच्यात पार पडली. आॅडिशनमध्ये एकूण १२ जोड्या सहभागी झाल्या. यापैकी आठ जोड्या अंतिम फेरीची निवडण्यात आल्या.
स्पर्धकांना आॅडिशनमध्ये एकूण तीन फेऱ्यांत यश मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचे होते. आॅडिशनच्या विविध चरणांचे संचालन नानकी सनप्ला, पूजा राठोड, रेहाना सिद्दीकी, ज्योती देशमुख व स्मिता दखने यांनी केले. अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आल्या जोड्यांमध्ये सुषमा अग्रवाल व किरण चांडक, मेघा शहारे व रेखा शहारे, प्रग्ना मेहता व कृतिका सेठ, संगीता चौरसिया व शारदा चौरसिया, वैशाली गिरीपुंजे व बुशरा सिद्दीकी, स्मिता सावंत व राधा खंडेलवाल, सुप्रिया डोंगरे व माधुरी पाटील, अर्पणा गुप्ता व पूजा कोठारी यांचा समावेश आहे. आभार सखी मंचच्या जिल्हा संयोजिका दीपा भौमिक यांनी मानले.
भवभूती रंगमंदिरात २९ जुलै रोजी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात स्पर्धकांना एकूण सहा फेऱ्यांत आपल्या प्रतिभेचे सादरीकरण करावयाचे आहे. स्पर्धकांना एक गाणे दिले जाईल. त्याच्या अंतिम शब्दपासून सुरूवात करून दुसऱ्या स्पर्धकाला गीत गावे लागेल. दुसऱ्या फेरीत स्पर्धकांना दिलेल्या गाण्याचा अंतरा किंवा शब्द ओळखून त्याला गावे लागेल. तिसऱ्या फेरीत गाणे एकूण चित्रपट किंवा गायकाचे नाव सांगायचे आहे. चौथ्या फेरीत स्पर्धकांना कोणतीतरी वस्तू दिली जाईल, त्या आधारावर चित्रपटाचे नाव किंवा गीत गावे लागेल. पाचव्या फेरीत फ्यूजन राऊंड होईल.
सहाव्या व शेवटच्या फेरीत स्पर्धकांना देण्यात आलेली हिट फिल्मी जोडीवर चित्रांकित केलेला गीत गावे लागेल व चित्रपटाचे नावही सांगावे लागेल. जर स्पर्धक कोणत्या प्रश्नाचे उत्तर देवू शकणार नाही तर उपस्थित प्रेक्षकांना उत्तर विचारले जातील व त्यांना पुरस्कृत करण्यात येईल. अधिक माहितीसाठी (९४२३६८९६६४) यावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Finalize the audition round of Antakshari tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.