‘एडवेंचर स्पोर्टस्’मध्ये भर
By Admin | Updated: January 25, 2016 03:10 IST2016-01-25T03:10:09+5:302016-01-25T03:10:09+5:30
सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल येथे ‘एडवेंचर स्पोर्ट्स’ च्या माध्यमातून जिल्हा पर्यटन समितीने पर्यटकांसाठी एक विशेष भेट

‘एडवेंचर स्पोर्टस्’मध्ये भर
कपिल केकत ल्ल गोंदिया
सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल येथे ‘एडवेंचर स्पोर्ट्स’ च्या माध्यमातून जिल्हा पर्यटन समितीने पर्यटकांसाठी एक विशेष भेट दिल आहे. त्यात मात्र आता भर पडणार असून आणखी काही विविध स्पोटर््स त्यात जोडले जाणार आहेत. जिल्हा पर्यटन समितीकडून यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आली असून लवकरच यासाठीची कामे सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक तरूणांच्या माध्यमातूनच या ‘एडवेंचर स्पोटर््स’चा पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे.
सालेकसा तालुकास्थळापासून सुमारे आठ कि.मी. अंतरावरील कोसमतर्रा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेले हाजराफॉल हे पर्यटन स्थळ वनविभागाच्या अखत्यारित येते. हाजराफॉल जरी पर्यटकांना आकर्षीत करीत असले तरी काही तासांचा विरंगुळा केल्यानंतर दिवस घालविण्यासाठी येथे दुसरे असे काहीच नव्हते. अशात पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात अवघा दिवस घालविता यावा या दृष्टीकोनातून हाजराफॉल येथे ‘एडवेंचर स्पोटर््स’ सुरू करण्याची संकल्पना वन विभागाचे उप वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांना सुचली व त्यांनी ‘एडवेंचर स्पोटर््स’चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत असलेल्या जिल्हा पर्यटन समितीकडे मांडला होता. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनाही आवडला व त्यांनी याला लगेच मंजूरी दिली होती.
३६ लाखांच्या या प्रोजेक्ट अंतर्गत मागील वर्षी बरमा ब्रिज, पॅरेलल ब्रिज, नेट क्रॉसिंग, रॅपलींग हे क्रीडा प्रकार येथे सुरू करण्यात आले होते. यासाठी जवळील ग्राम नवाटोलावासीयांची वन व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली व त्यांच्याच माध्यामातून हाजराफॉलची आता देखभाल केली जात आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत आता हाजराफॉल मध्ये आणखीही क्रीडा प्रकारांची भर घातली जाणार आहे. यासाठी जिल्हा पर्यटन समितीने निधी उपलब्ध करवून दिला असून यासाठीचे कार्यादेश मुंबईच्या अलाईड एडवेंचर स्पोर्ट यांना देण्यात आले आहे. लवकरच या कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती आहे.
सर्व कारभार वन व्यवस्थापन समितीकडे
४हाजरा फॉलकडे वन विभागाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळाचा विकास होऊ शकला नाही. विशेष म्हणजे वन विभाग याकडे सातत्याने लक्ष देऊ शकत नसल्याने स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच याचा विकास साधण्यासाठी वन विभाग प्रयत्नरत आहे. यामुळे इको-डेव्हलपमेंट अंतर्गत नवाटोला येथे वन व्यवस्थापन समिती गठित करून त्यांच्या मार्फत सध्या या स्थळाची स्वच्छता, व्यवस्थापन व अनैतिक प्रकारांवर आळा घालण्याचे कार्य केले जात आहे. वन विभागाच्या परित्रकानुसार वन व्यवस्थापन समितीला पर्यटकांकडून शुल्क आकारण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. पुढेही हाजरा फॉलच्या माध्यमातून येणारे उत्पन्न वन व्यवस्थापन समितीकडेच राहणार असून त्यातूनच समितीला या स्थळाचा विकास व देखरेख व अन्य खर्च वहन करायचे आहेत. तसेच येथील लोकांच्या हाताला यातूनच काम उपलब्ध होणार आहेत.