धमकी देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST2021-07-27T04:31:00+5:302021-07-27T04:31:00+5:30

................ पतीवर गुन्हा दाखल गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावराटोली गोंदिया येथील मंजू नरेश हतकैया (३८) यांना शिवीगाळ ...

Filed a case against the threatening husband | धमकी देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

धमकी देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

................

पतीवर गुन्हा दाखल

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावराटोली गोंदिया येथील मंजू नरेश हतकैया (३८) यांना शिवीगाळ करून आरोपी नरेश बाबुलाल हतकैया (४२) याने २५ जुलैच्या सकाळी ९ वाजता पत्नीला शिवीगाळ करून तिला ठार करण्याची धमकी दिली. आरोपी दारू पिऊन तिला शिवीगाळ करायचा. यासंदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

...............

नवीन घराच्या बांधकामावरून वाद

गोंदिया: शहराच्या हिरकाशी नगर सुंदरनगर जवळ येथील नीरज रमेशचंद्र अग्रवाल (४५) यांच्या जुन्या घराच्या मागील बाजूला २६ जुलै रोजी आरोपी राजू परसराम सोनकुटे (५५) रा. हरिकाशीनगर याने नवीन घारासाठी खोदकाम केले. त्यात झालेल्या वादात त्याने शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Filed a case against the threatening husband