टॅÑक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:48 IST2017-08-27T20:48:14+5:302017-08-27T20:48:45+5:30
फलाट ओलांडण्यासाठी किंवा गाडी पकडण्याच्या नादात ट्रॅक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम प्रवाशांकडून केला जात आहे. येथील रेल्वे स्थानकावरील हा रोजचाच प्रकार झाला आहे.

टॅÑक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : फलाट ओलांडण्यासाठी किंवा गाडी पकडण्याच्या नादात ट्रॅक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम प्रवाशांकडून केला जात आहे. येथील रेल्वे स्थानकावरील हा रोजचाच प्रकार झाला आहे. यातच कित्येकांचा जीव गेला असला तरिही स्थानिक रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. मात्र या प्रकारावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकातून नागपूर, रायपूर, बालाघाट व चंद्रपूर या चारही दिशांनी रेल्वेगाड्या धावतात. त्यातच इतर प्रवाशांसह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी अपडाऊन करतात. नागपूर, कामठी, भंडारा, तुमसर व तिरोडा इत्यादी स्थानकांतून प्रवासी मोठ्या संख्येने गोंदियाला येतात. सकाळी इंटरसिटी एक्स्प्रेस, इतवारी-रायपूर लोकल व विदर्भ एक्स्प्रेसने मोठ्या संख्येत प्रवासी गोंदिया स्थानकावर येतात. मात्र यापैकी अनेक प्रवासी रॅम्प किंवा पायदळ पुलाचा वापर न करता सरळ ट्रॅक ओलांडून दुसºया फलाटावर पोहोचतात व स्थानकाबाहेर पडतात. यावेळी त्यांना आळा घालण्यासाठी तेथे रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे पोलिस हजर नसतात.
शॉर्टकटच्या नादात हा प्रकार प्रवाशांच्या जिवावर बेतणारा ठरू शकतो. मात्र प्रतिबंधासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही. केवळ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांचे ज्या दिवशी गोंदिया स्थानकात आगमन होते त्याच दिवशी पोलिसांचा बंदोबस्त व तिकीट निरीक्षकांची व्यवस्था केली जाते. मात्र या प्रकारातून अपघातांची शक्यता बळावली असून कारवाईची गरज आहे.