अतिदुर्गम भागातील रामगढ शाळेचा सत्कार

By Admin | Updated: September 18, 2014 23:36 IST2014-09-18T23:36:56+5:302014-09-18T23:36:56+5:30

जिल्हा परिषदेच्या गावची शाळा आमची शाळा प्रकल्पात चिचगड प्रभागातून प्रथम आलेल्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील रामगढ शाळेचा सत्कार करण्यात आला. रामगढ येथेच या

Felicitation of Ramgarh school in the remote areas | अतिदुर्गम भागातील रामगढ शाळेचा सत्कार

अतिदुर्गम भागातील रामगढ शाळेचा सत्कार

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या गावची शाळा आमची शाळा प्रकल्पात चिचगड प्रभागातून प्रथम आलेल्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील रामगढ शाळेचा सत्कार करण्यात आला. रामगढ येथेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शाळेचे मुख्याध्यापक मिथून के. चव्हाण, आर.बी. धमगाये (स.शि), रमेश केराम (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), मोरेश्वर पुराम (पोलीस पाटील) यांच्या सहकार्यामुळे सत्र २०१२-२०१३ आणि २०१३-२०१४ या दोन्ही वर्षात या शाळेने प्रभागामध्ये गावची शाळा आमची शाळा आणि माझी समुद्ध शाळा यामध्ये प्रभागात प्रथम क्रमांक पटकाविला.
मुख्याध्यापक मिथून चव्हाण हे जेव्हापासून या शाळेत आले तेव्हापासून त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि त्यांची मेहनत पाहून केंद्रप्रमुख एच.बी. रहांगडाले, गटशिक्षणाधिकारी के.जी. भांडारकर, वरिष्ठ विस्तार अधिकारी के.एस. धुवाधपाडे, गटसमन्वयक एल.बी. तितराम आणि इतर वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली.
चव्हाण यांनी माहिती घेवून गावाचा आणि गावातील विद्यार्थ्यांचा गुणात्मक, भौतिक आणि इतर बाबतीत कसा विकास होईल याबाबत सतत विचारमंथन सुरू असते. त्यांनी सत्र २०१४-१५ मध्ये सुद्धा काय नाविण्यपूर्ण उपक्रम करता येईल याचेसुद्धा नियोजन केले आहे. त्यामध्ये गावातील नवयुवक, पालकांचे सुद्धा सहकार्य घेतले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitation of Ramgarh school in the remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.