तिरोडा बाजार समितीत शेतकऱ्यांचा सत्कार

By Admin | Updated: September 24, 2015 02:14 IST2015-09-24T02:14:29+5:302015-09-24T02:14:29+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन धानाची पिक घेऊन येणाऱ्या भजेपार येथील धर्मलाल नत्थू बोपचे यांचा सत्कार आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, ....

Felicitation of farmers in Tiroda Market Committee | तिरोडा बाजार समितीत शेतकऱ्यांचा सत्कार

तिरोडा बाजार समितीत शेतकऱ्यांचा सत्कार

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन धानाची पिक घेऊन येणाऱ्या भजेपार येथील धर्मलाल नत्थू बोपचे यांचा सत्कार आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, मुख्य प्रशासक डॉ.चिंतामण रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
यावेळी प्रशासक संजयसिंह बैस, डॉ.वसंत भगत उपस्थित होते. धर्मलाप बोपचे भजेपार यांनी आता रुची या नवीन वाणाचे पिक घेतले व ते तिरोडा येथील कृ.उ.बा. समितीमध्ये विकण्यास आणले. त्यांच्या धानाला २९०१ रुपये प्रतीक्विंटल भावसुद्धा मिळाला. हा धान व्यापारी अनमोल शहारे यांनी खरेदी केला. सर्वोच्च भावात धान खरेदी केल्याने शहारे यांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आ.विजय रहांगडाले यांनी सरकार शेकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, मी शेतकऱ्याचा पूत्र असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील, असे सांगितले. मुख्य प्रशासक डॉ.चिंतामन यांनी कृउबा समितीमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, याची हमी दिली. कार्यक्रमाचे संचालन बाबा बैस तर आभार प्रदर्शन कार्तिक बिसेन यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी, आडतिया, व्यापारी, काटेकरी, हमाल यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Felicitation of farmers in Tiroda Market Committee