राहुल डोंगरवारचा व्हिसीएतर्फे सत्कार

By Admin | Updated: February 8, 2017 01:14 IST2017-02-08T01:14:20+5:302017-02-08T01:14:20+5:30

व्हीसीए अकादमीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत विदर्भाने प्रथमच क्रिकेटमध्ये राष्ट्रीय जेतेपद मिळविले.

Felicitated by Rahul Dongraar VCA | राहुल डोंगरवारचा व्हिसीएतर्फे सत्कार

राहुल डोंगरवारचा व्हिसीएतर्फे सत्कार

गोंदिया : व्हीसीए अकादमीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत विदर्भाने प्रथमच क्रिकेटमध्ये राष्ट्रीय जेतेपद मिळविले. त्यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकमेव खेळाडू राहुल ओमप्रकाश डोंगरवार याचा व्हीसीए अध्यक्ष आनंद जायस्वाल यांच्या हस्ते एक लाख रूपये व १५ हजार रूपयांचे गिफ्ट देवून सत्कार करण्यात आला.
सविस्तर असे की, १६ वर्षे वयोगटासाठी बीसीसीआय आयोजित मर्चंट करंडक स्पर्धेच्या चार दिवसांच्या अंतिम सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशला १७१ धावांनी नमवित चार लाख रूपयांचा पुरस्कार तसेच आकर्षक करंडक पटकाविला. यानिमित्त विदर्भ क्रिकेट अ‍ॅकादमीने बालमोरिया हॉल, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सत्कार व स्रेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात राहुलला रोख, भेटवस्तू, तसेच प्रोत्साहन म्हणून सामना शुल्क व इतर भत्ते यांचा लाभ देण्यात आला.
याप्रसंगी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत वैद्य, आंतरराष्ट्रीय अंपायर भट्टी, प्रशिक्षक रंजित पराळकर, सहस्त्रबुद्धे, स्पॉन्सर अमर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated by Rahul Dongraar VCA