पाच उत्कृष्ट रणरागीणींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:51 IST2017-09-16T21:51:40+5:302017-09-16T21:51:58+5:30
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत ‘बेटी बचाओ’ उपक्रम राबवीत समता गणेश मंडळाच्या ‘ती’ च्या गणपतीद्वारे समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन शहराचा मान उंचावणाºया पाच रणरागीणींचा सत्कार....

पाच उत्कृष्ट रणरागीणींचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत ‘बेटी बचाओ’ उपक्रम राबवीत समता गणेश मंडळाच्या ‘ती’ च्या गणपतीद्वारे समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन शहराचा मान उंचावणाºया पाच रणरागीणींचा सत्कार मंडळाच्या महिला पदाधिकाºयांच्या हस्ते करण्यात आला.
समता गणेश मंडळाद्वारे यंदा २३ वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या दरम्यान स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलसंवर्धन, साक्षरता, बेटी बचाओ-बेटी पढाओ करीता विशेष जनजागृती करण्यात आली. या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांकरीता निबंध लेखन, चित्रकला, बोरा दौड, सूईदोरा, संगीत खुर्ची, चमचा गोळी, नृत्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम व दुसरे स्थान पटकाविणाºया स्पर्धकांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणाकरीता महिलांना विशेष मान देण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाची अध्यक्षता डॉ. प्रा. वर्षा गंगणे यांनी केली. मुख्य अतिथी म्हणून नगराध्यक्षा सुमन बिसेन, प्राचार्य रजिया बेग, प्राचार्य लिना जैस्वाल, प्राचार्य सावसागडे, नूतन कोवे, नगरसेविका कौशल्या कुंभरे, माया निर्वाण, निर्मला अग्रवाल तसेच प्रभागातील महिला मंचावर उपस्थित होत्या.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात गंगणे यांनी, पहिल्यांदाच गणेश मंडळाद्वारे महिलांना मान देवून ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबविला जात असून ते कौतुकास्पद आहे. मंडळाने महिला सक्षमीकरणासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत जे कार्य केले आहे. त्याचे सातत्य दरवर्षी असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी सर्व मान्यवर महिलांनी मार्गदर्शन केले.
संचालन विलास शिंदे यांनी केले. गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविण्याकरीता मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाठक, सचीव अॅड. भूषण मस्करे, किशोर येनोटीवार, योगेश बिसेन, मुन्ना अग्रवाल, काशीनाथ कांबळे, दामु शेंद्रे, हरिश दोनोडे, धनवंत कळंबे, राजू टेंभुरकर, गणेश कराडे, संकल्प पाठक, लक्ष्मीकांत पाठक, उत्तम मामा, संजय एनोडीवार, दिनेश कराडे, बाल्या देशकर तसेच महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाºयांनी सहकार्य केले.
यांचा केला सत्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन शहराचा मान गर्वाने उंचावणाºया पाच उत्कृष्ट महिलांना यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये साहीत्य व शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध साहित्य लिहिणाºया मनोहरभाई पटेल महाविद्यालयच्या प्राध्यापिका डॉ. गंगणे, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करुन गरीबांकरीता नेहमी झटणाºया नगरसेविका कौशल्या कुंभरे, मोलमजूरी करुन आपल्या मुलाला सीईओ या पदावर नेणाºया कुसुम गणेश कोवे, आरोग्य विभागात मागील ३० वर्षापासून कार्य करुन गरोदर महिलांची काळजी घेणाºया तसेच पोलीओ लसीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणाºया सुशीला सिध्दार्थ शहारे, पोलीस विभागात २१ वर्षापासून कार्यरत महिला पोलीस आमिशा पठाण यांचा समावेश आहे.