वातावरणातील बदलामुळे नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:15+5:30
कोरोनाच्या भीतीने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात दररोजच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या सारख्या आजारांची भर पडत आहे. साधारण ताप, खोकला व सर्दी झाली तरी कोरोनाची लागण तर झाली नसावी या भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. ही नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रबोधनात्मक मार्गदर्शन शिबीर घेणे गरजेचे वाटत आहे.

वातावरणातील बदलामुळे नागरिकांमध्ये भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण होवून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या भीतीने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात दररोजच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या सारख्या आजारांची भर पडत आहे. साधारण ताप, खोकला व सर्दी झाली तरी कोरोनाची लागण तर झाली नसावी या भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. ही नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रबोधनात्मक मार्गदर्शन शिबीर घेणे गरजेचे वाटत आहे.
वास्ताविक बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडत आहे. रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सहज ताप, खोकला व सर्दी यासारखे आजार बळावतात.
अशात नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सप्टेंबर महिन्यात कधी पाऊस तर कधी उन्ह असा खेळ सुरु होता.
या दररोजच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होवून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले.
सामान्य ताप, खोकला व सर्दी असणाºया रुग्णांनी घाबरुन जाण्याची गरज नाही जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून औषधोपचार करावा असे डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले आहे.
लॉकडाऊन शिथील झाल्यापासून हॉटेल व टपºया सुरु झाल्या आहेत. अशात नागरिकांनी उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार उद्भवू शकतात करिता पाणी उकळून प्यावे, सुदृढ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, हात नेहमी धूत राहून स्वच्छ ठेवावे, ताप, सर्दी व खोकला या आजारांकडे दुर्लक्ष करु नये असे वैद्यकीय अधिकारी डॉ.मंडल यांनी कळविले आहे.