शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

दारूबंदीसाठी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 9:42 PM

शहराच्या छोटा गोंदिया वॉर्ड क्र.२ परिसरात वैध, अवैध देशी दारू दुकान, बिअर बार, गल्लोगल्लीत सुरू असलेले कॅसिनो क्लब, जुगार क्लब, कॅरम क्लब, लॉटरी व्यवसाय, गांजा विक्री व सट्टा जोमात आहे.

ठळक मुद्देअवैध धंद्याना ऊत : लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी, आंदोलन तीव्र करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराच्या छोटा गोंदिया वॉर्ड क्र.२ परिसरात वैध, अवैध देशी दारू दुकान, बिअर बार, गल्लोगल्लीत सुरू असलेले कॅसिनो क्लब, जुगार क्लब, कॅरम क्लब, लॉटरी व्यवसाय, गांजा विक्री व सट्टा जोमात आहे. त्यामुळे समाजस्वास्थ धोक्यात आले आहे. तरूणपिढी व्यसनाच्या व वाम मार्गाच्या गर्ततेत जात असल्याने हे अवैध धंदे व दारू दुकाने बंद करण्यात यावे, या मागणीला घेऊन छोटा गोंदियातील महिलांनी आजपासून (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.छोटा गोंदियात सुरू असलेली दारू दुकान, बिअरबार बंद करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे केली होती.संपूर्ण दारूबंदीसाठी ११९४ महिलांपैकी ९४९ महिला दारूबंदीसाठी पुढे आल्या होत्या. हे प्रमाण २५ टक्के आहे. परंतु दारूबंदी समितीने केलेल्या मागणी अर्जाला चुकीचे दर्शवून राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदीवर निवडणूक घेण्यास तयार नाही.शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून महिलांची टक्केवारी २५ टक्यापेक्षा कमी दाखवित आहेत. राज्य उत्पादन शुल्क दारूविक्रेत्यांना पाठीशी घालत असल्यामुळे सोमवारपासून (दि.२१) छोटा गोंदियातील महिला व पुरूष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.उपोषणाला मिना रामटेके, सुनिता बारसागडे, बबीता उके, रंजना मेश्राम, सुजिता मेश्राम, लतीका गणवीर, सत्यज्वाला बागडे, पदमा गणवीर, रंजू गजभिये, कल्पना मेश्राम, रेखा रामटेके, करूणा उके, जयतुरा मेश्राम, पदमा रंगारी, मिनाक्षी गणवीर, नलू मेश्राम, राखी खोब्रागडे, संगीता उके, दीपमाला उके, गौतमा उके, सारीका मेश्राम, प्रतिमा सावनकर, मनू उके, मिमीका वैद्य, रेखा मेश्राम यांचा समावेश आहे.