रब्बीच्या धान खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:19+5:302021-04-10T04:28:19+5:30
नवेगावबांध : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर खरिपात खरेदी केलेल्या धानाने गोदाम भरले असून काही ठिकाणी धानाचे पोते उघड्यावर ...

रब्बीच्या धान खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा ()
नवेगावबांध : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर खरिपात खरेदी केलेल्या धानाने गोदाम भरले असून काही ठिकाणी धानाचे पोते उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. भरडाईसाठी व्यापाऱ्यांनी धानाची उचल केली नसल्यामुळे सर्व गोदाम हाऊसफुल्ल आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धानाची खरेदी आधारभूत केंद्रांवर होणार की नाही, याबाबत शंका असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रब्बी हंगामातील धान पीक येत्या काही दिवसांत बाजारपेठेत येणार आहेत. त्या धानाची खरेदी वेळेत झाली नाही तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन सर्वच्या सर्व धान पावसात भिजण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने तयारी करून धान खरेदी केली नाही तर शेतकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढणार आहे हे मात्र निश्चित. रब्बी हंगामातील धान येत्या एक महिन्यात धान खरेदीसाठी केंद्रांवर येईल. त्यावेळी प्रशासनाने आधारभूत हमीभाव केंद्रावर धान खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. असे झाले नसेल तरी शेतकऱ्यांचे धान पावसाळ्यात भिजेल आणि धान खरेदी रखडेल व व्यापारी वर्गाकडून या धानाला मातीमोल भावाने खरेदी केले जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. मातीमोल भाव मिळूनसुद्धा त्या धानाचे पैसे वेळेवर मिळणार की नाही, याचीसुद्धा शाश्वती शेतकऱ्यांना नाही. म्हणून प्रशासनाने हमीभाव दराने धान खरेदी करावी व त्यासाठीची तयारी प्रशासनाने वेळेच्या आत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.