शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

By admin | Updated: December 19, 2015 01:50 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, बँकेचे कर्ज आणि सावकाराकडील गहाण या सर्वांची सांगड घालण्यासाठी ...

वनविभागाने केली थट्टा : एक एकरासाठी नुकसानभरपाई अडीच हजार रुपये!अर्जुनी मोरगाव : कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, बँकेचे कर्ज आणि सावकाराकडील गहाण या सर्वांची सांगड घालण्यासाठी शेतकरी दिवसरात्र एक करुन शेतमळा फुलवतो. तीन महिन्यांने पीक हातात येईल आणि सदर प्रश्ने मार्गी लागतील, ही आस उराशी ठेवून प्रत्येक शेतकरी डोलणाऱ्या पिकाकडे मोठ्या मायेने बघतो. याच पिकावर संपूर्ण वर्षाचा ताळेबंद अवलंबून असतो. मात्र श्वापदांनी नुकसान केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून एकरामागे अडीच हजार रूपये देवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.काळ्यारात्री जंगली डुकरे पिकात शिरून पिकांची नासधूस करतात. हा प्रकार पाहून हतबल शेतकरी स्वप्न भंगले म्हणून टाहो फोडतो. मदतीसाठी सरकारी दफ्तरात उंबरठे झिजवितो. सरकारच आपले मायबाप हे ध्यानात घेऊन शेवटची आस म्हणून केवीलवाण्या नजरेने शासकीय मदतीची वाट बघतो. उशिरा का होईना मदत हाती लागते, मात्र तीसुद्धा तुटपूंजी आणि पुन्हा स्वप्न दुभंगतो. अशीच वास्तव दुर्दैवी घटना तालुक्यातील अरततोंडी-दाभना येथील वयोवृद्ध शेतकरी वासुदेव झिंगर राखडे यांच्याशी घडली.वासुदेव राखडे यांनी दाभना येथील गट क्रमांक ३०७ मध्ये ०.७६ हे.आर.मध्ये धान पिकाची लागवड केली. सदर पिकात जंगली डुकरांनी प्रवेश करुन संपूर्णपणे नासधूस केल्याची तक्रार २९ सप्टेंबरला वनपरिक्षेत्राधिकाऱ्याकडे केली. नासधूस झालेल्या क्षेत्राचे छायाचित्र काढण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी तब्बल २९ छायाचित्रे तक्रार अर्जासोबत जोडले.नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत वनरक्षक, कृषी सहायक आणि तलाठी यांच्या तीन सदस्यीय समितीने ५ आॅक्टोबर रोजी घटनास्थळी जावून मौका पंचनामा करुन झालेल्या नुकसानीचा अहवाल वनपरिक्षेत्राधिकारी अर्जुनी मोरगाव यांना सादर केला. तपासी अधिकाऱ्यांनी ०.७६ हे.आर.पैकी ०.७३ हे.आर. मध्ये लागवड केलेल्या धान पिकामधून रानडुकरे गेल्याने त्यांच्या खुदबळीमुळे फक्त १.८० क्विंटल धान पिकाची नुकसान झाल्याचे अहवालामध्ये नोंदविले. प्रकाष्ट निष्कासन अधिकारी नवेगावबांध व्ही.जी. उदापुरे यांच्या ५ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, शेतकरी राखडे यांनी मिळालेल्या पत्रात गट क्र. ३०७ मधील ०.७६ हे.आर.पैकी ०.७३ हे.आर. धानपिकातून रानडुकरे गेल्याने खुदवळीमुळे १.८० क्विंटल धानाचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई म्हणून दोन हजार ५३८ रूपयांचा ३ डिसेंबरच्या तारखेचा धनादेश वासुदेव राखडे यांना दिला गेला. यावर सदर शेतकऱ्यांने हरकत घेतली. एक एकर मधील जवळपास १४ हजार रूपयांचे नुकसान झाले असूनही तपासी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप लावला आहे. पंचनामा करतेवेळी नुकसान झालेल्या तब्बल २९ ठिकाणचे २९ फोटो ज्यांचा खर्च एक हजार ४५० रूपये झाला, मग फक्त १८० क्विंटल धानाचे नुकसान कसे शक्य आहे? असा सवाल राखडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे पंचनामा करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका एकरातील नुकसान भरपाई फक्त अडीच हजार रूपये, हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर केंद्रात व राज्यात सत्तेत आलेली नवी सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा हा ज्वलंत उदाहरण आहे. तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, भूमिपूत्र शेतकरी नेते आणि जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या या थट्टेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)