धान भाववाढीच्या आदेशाने शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST2020-03-08T05:00:00+5:302020-03-08T05:00:07+5:30
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनातर्फे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्गंत शासकीय धान खरेदीच्या केंद्राच्या माध्यमातून केली जाते. शासनाने यंदा धानाला १८१५ ते १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने धानाला ७०० रुपये बोनस जाहीर केला.

धान भाववाढीच्या आदेशाने शेतकऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या दरात प्रती क्विंटल दोनशे रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या संदर्भातील आदेश निघाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम होता. अखेर शुक्रवारी (दि.६) शासनाने धानाच्या दरात दोनशे रुपये भाववाढ केल्याचे आदेश काढले. त्यामुळ जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनातर्फे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्गंत शासकीय धान खरेदीच्या केंद्राच्या माध्यमातून केली जाते. शासनाने यंदा धानाला १८१५ ते १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने धानाला ७०० रुपये बोनस जाहीर केला.
तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या दरात प्रती क्विंटल २०० रूपयांनी वाढ करण्याची घोषणा केली.बोनस जाहीर केल्याचे आदेश निघाले होते.
मात्र दोनशे रुपये दरवाढीचे आदेश घोषणेला तीन महिने होऊनही निघाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी सुध्दा शेतकऱ्यांना कोणत्या दराने पैसे द्यायचे याबाबत संभ्रमात होते.
तर याला घेऊन शेतकऱ्यांची सुध्दा ओरड वाढली होती. अखेर शासनाने शुक्रवारी धानाच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ केल्याचे आदेश काढले. हे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाला सुध्दा प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
८५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली आहे. एकट्या फेडरेशनने आत्तापर्यंत २६ लाख ५२ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या या सर्व ८० हजार शेतकºयांना या दरवाढीचा लाभ मिळणार आहे.