कालव्यात शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:13+5:30
रब्बी हंगामाच्या धानपिकाला इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनाने सिंचन उपलब्ध करु न द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. दोन ते तीनदा शेतकरी व अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात बैठका झाल्या. लागवड क्षेत्रातील सर्व लाभधारकांना सिंचन उपलब्ध करून देण्याचा निश्चय झाला. मात्र मोटार पंपधारकांना यातून वगळण्याचा निर्णय झाला.

कालव्यात शेतकऱ्यांचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : मोटारपंपधारक शेतकºयांना रब्बी हंगामाच्या धानपिकाला सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी इटियाडोह धरणाच्या ताडगाव मुख्य कालव्यात शनिवारपासून (दि.४) शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.
इटियाडोह धरण हे येथील शेतकऱ्यांच्या हरितक्र ांतीचे स्वप्न साकारणारे प्रकल्प आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. उन्हाळी धानपिकासाठी गोठणगाव, अर्जुनी, वडेगाव, कोरंभी, लाखांदूर, बारव्हा, वडसा, कोंढाळा, आरमोरी शाखेतील १० हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचन देण्याचे नियोजित आहे. गत सहा वर्षांनंतर यावर्षी इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. सध्या धरणात २९६ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामाच्या धानपिकाला इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनाने सिंचन उपलब्ध करु न द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. दोन ते तीनदा शेतकरी व अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात बैठका झाल्या. लागवड क्षेत्रातील सर्व लाभधारकांना सिंचन उपलब्ध करून देण्याचा निश्चय झाला. मात्र मोटार पंपधारकांना यातून वगळण्याचा निर्णय झाला. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली होती. गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांत आक्रोश होता. यामुळे सर्व पंपधारक एकत्र आले. ते जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा भेटले. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शनिवारी (दि.४) सकाळी ताडगाव कालव्यात शेकडो शेतकरी एकत्र आले. त्यांनी ३ किमी. पदयात्रा काढत पाटबंधारे उपविभाग गाठले. उप विभागीय अभियंता भिवगडे यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी उप विभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाळे यांना निवेदन दिले. लगेच तहसीलदारांकडे मोर्चा वळविला व नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांना निवेदन दिले. त्यानंतर ही पदयात्रा ताडगाव कालव्यावर पोहोचली व तिथे दुपारी १ वाजताच्या सुमारास उपोषणाला बसले. उपोषण मंडपाला माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली.
वरिष्ठांना प्रस्ताव पाठविणार
पंपधारक शेतकरी सिंचनासाठी अत्यंत आग्रही आहेत. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार सुरू आहे. आपल्या सहकाऱ्यांना बोलावून त्यांचे नियोजन करणे सुरू आहे. हा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करणार आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर पंपधारकांना सिंचन सुविधा पुरविली जाईल. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन उप विभागीय अभियंता भिवगडे यांनी केले.
अटींचे पालन करावे
मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात पेरणी करू नये.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक १ हेक्टरपर्यंत पीक लागवड करावी
वर्षानुवर्षे थकीत असलेल्या पाणसाऱ्यांचा १०० टक्के भरणा करावा.
परवानगी क्षेत्राव्यतिरिक्त अधिक क्षेत्र भिजवू नये. स्वत: पाणी विकून इतर शेतकऱ्यांना देऊ नये. ४प्रत्येक पाळीत ४ दिवस पाणी घेण्याची ठराविक वेळेत मुभा राहील.
उपोषणकर्त्यांच्या या आहेत मागण्या
चालू हंगामाकरिता सर्व पंपधारकांना पाणी मिळावे, हक्क असलेल्यांना प्रवाह पद्धतीप्रमाणे मोटार पंपधारकांना सामावून घ्यावे, मुख्य कालव्यात शेती गेलेल्या लाभधारकांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले द्यावे, पानसारा करावरील व्याजमुक्त करावे, ९५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने पाणी द्यावे या मागण्यांसाठी शेतकरी उपोषणावर बसले आहेत.