शेतकऱ्यांचा प्रयोग ठरतोय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:14+5:30

शासनाच्या शेततळे योजनेंतर्गत तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळे व बोडी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरत्र पीक व उत्पादन घ्यावे असा उद्देश शासनाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर कृषी विभाग खूप भर देत आहे. मागेल त्याला शेततळे व बोडी देण्यात आले आहेत.

Farmers experimentation is proving inspiring | शेतकऱ्यांचा प्रयोग ठरतोय प्रेरणादायी

शेतकऱ्यांचा प्रयोग ठरतोय प्रेरणादायी

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : सततच्या अस्मानी व अवकाळी संकटांना सामोरे जाणाऱ्यां शेतकऱ्यांना काही तरी जोडधंदा करण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील शेतकºयाने मिळालेल्या बोडीत मत्स्यपालन व शिंगाडा उत्पादन करुन शेतीतील तूट भरुन काढली. शिवाय आणखी एक यशस्वी प्रयोग सेंद्रीय भागात पिकाच्या शेतात मस्त्यपालन करुन उत्पन्नात दुपटीने वाढ केली आहे. या प्रयोगातून शेतकºयाने इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
शासनाच्या शेततळे योजनेंतर्गत तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळे व बोडी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरत्र पीक व उत्पादन घ्यावे असा उद्देश शासनाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर कृषी विभाग खूप भर देत आहे. मागेल त्याला शेततळे व बोडी देण्यात आले आहेत. त्यातून ग्राम बिहिरीया येथील शेतकरी डुलीचंद नारायण पटले यांनी पारंपारीक पिकांसह दुसरे पीक घेण्याचा विचार केला. त्यात त्यांनी मिळालेल्या बोडीत मत्स्य जिवांची बिजाई टाकून मत्स्य उत्पादन घेतले.
सोबतच शिंगाड्याची शेतीही केली व त्यातून यशस्वीपणे उत्पादन घेवून भात पिकाची तुट भरुन काढली. एवढ्यावरच न थांबता आणखी एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाची पायाभरणी केली.
सेंद्रीय भाताच्या शेतात मत्स्य जिवांची बिजाई घालून भाताबरोबरच मत्स्य उत्पादन हा प्रयोग यशस्वी केला व आपल्या उत्पन्नात दुपटीने वाढ केली. त्यामुळे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची प्रशंसा संपूर्ण जिल्हास्तरावर होत आहे.
हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच संपूर्ण जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाºयांनी भेट देवून पाहणी केली.

Web Title: Farmers experimentation is proving inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी