किसान सन्मान निधीचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:22+5:30

केंद्र सरकारने सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना टप्याटप्याने निधी देणे सुरु केले होते. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात ३ टप्प्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये थेट बँकेत जमा झाले. तर काही शेतकऱ्यांना योजनेच्या २ च टप्यांचीच निधी बँक खात्यामध्ये जमा झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही या योजनेचा निधी जमा झालेला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारुन कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.

Farmers blow up funds for farmers' honor | किसान सन्मान निधीचा उडाला बोजवारा

किसान सन्मान निधीचा उडाला बोजवारा

Next
ठळक मुद्देबहुतांश शेतकरी वंचित : खात्यावर निधी जमा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवाडी : निवडणुकी पूर्वी अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा अंशत: लाभ मिळाला असून बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सरकारच्या या योजनेचा बोजवारा उडाला आहे.
केंद्र सरकारने सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना टप्याटप्याने निधी देणे सुरु केले होते. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात ३ टप्प्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये थेट बँकेत जमा झाले. तर काही शेतकऱ्यांना योजनेच्या २ च टप्यांचीच निधी बँक खात्यामध्ये जमा झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही या योजनेचा निधी जमा झालेला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारुन कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु संबंधित प्रशासन शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक न देता आज येणार उद्या येणार असे उडवा-उडवीचे उत्तर देत वंचित शेतकऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवित आहेत. मग अशा योजना राबविण्याचा अर्थच काय असा प्रश्न वंचिताकडून करण्यात येत आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ काही मोजक्याच शेतकऱ्यांना ठराविक वेळेवर मिळत आहे. तर पात्र शेतकऱ्यांची नावे बँकेच्या ऑनलाईन यादीत न आल्याने अनेक शेतकरी या योजनेच्या लाभाला मुकले आहे.
ही चूक नेमकी कुणाची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकी पुर्वी तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची यादी संबंधित विभागाकडून मागविण्यात आली होती. मात्र लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन करताना झालेल्या बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड मधील चुकांमुळे अनेक शेतकरी अद्यापही सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे बँक खात्यांमध्ये तात्काळ योजनेचा निधी जमा करावा अशी वंचितांची मागणी आहे.

Web Title: Farmers blow up funds for farmers' honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी