शेतकऱ्यांना ‘जलयुक्त’चा आधार

By Admin | Updated: October 2, 2016 01:36 IST2016-10-02T01:36:01+5:302016-10-02T01:36:01+5:30

धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे.

Farmers' Basis | शेतकऱ्यांना ‘जलयुक्त’चा आधार

शेतकऱ्यांना ‘जलयुक्त’चा आधार

उत्पादन वाढणार : म्हसवाणी परिसरात विहिरींमध्ये पाणीपातळी वाढली
गोंदिया : धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे. पण पावसाचा लहरीपणा, अनियमतिपणा, दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकरी नेहमीच संकटात सापडत होता. आता जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे म्हसवाणी परिसरातील सिंचन विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून शेतकऱ्यांची कोरड्या दुष्काळाच्या चिंतेतून मुक्तता होणार आहे.
पावसामुळे कधी कधी दुबार तिबार पेरणी करावी लागायची. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची व्हायची. लहान शेतकरी तसेच सर्वसामान्य शेतकरी कर्ज घेऊन शेतीची कामे करायचे पण, पावसाच्या लहरीपणाचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊन शेतकरी कर्जात बुडायचा.
शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा शेतीच्या कामासाठी पुरेपूर वापर करण्यासाठी म्हसवाणी या छोटयाशा गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१४-१५ या पाहिल्याच वर्षी निवड करण्यात आली.
या अभियानातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे म्हसवाणीच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. सोबतच धानाचे उत्पादनही वाढले आहे.
सडक/अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी या छोटयाशा गावाची लोकसंख्या १४४५ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २७६.९० हेक्टर आहे. पिकाखाली एकूण क्षेत्र २२०.५० हेक्टर आहे. भात हे मुख्य पिक असून या पिकाखाली १८६ हेक्टर क्षेत्र आहे. म्हसवाणी या छोटयाशा गावात दारीद्रय रेषेखाली जीवन जगणारेही शेतकरी आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या शेतात १८ विहीरी व ८ बोरवेल्स आहे. परंतू छोटया शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करावी लागत होती. शेतशिवारातून लहानसा नाला वाहत गेला आहे. पण या नाल्याचे पाणी पावसाळयाच्या दिवसात वाहून जात होते. जलयुक्त शिवार अभियानातून या नाल्यावर दोन बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी अडविल्या जावू लागले. त्यामुळे नाल्यात पाणी साठवू लागल्यामुळे भुर्गभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली.
विहीर व विंधन विहीरींची पातळी वाढली. नाल्याच्या दोन्ही काठावरील शेतीला पाण्यामुळे मदत झाली. पुर्वी या शेतकऱ्यांना नाल्याचा उपयोग होत नव्हता. जलयुक्तमुळे पाण्याची उपलब्धता झाली. पुर्वी या शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता होत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट व्हायची. कधी कधी तर एका पाण्याच्या अभावी हातचे पीक जायचे. मागील दोन वर्षात शेतीच्या उत्पादनातील पैसेवारी कमी आल्याने म्हसवाणी टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले होते. पण आता तिथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे नाला तुडूंब भरलेला आहे. या साठविलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळी तसेच पावसाळी पिकासाठी होईल असे गावातील शेतकरी सांगत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमूळे गावातील शेतकर्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

सिमेंट बंधाऱ्यामुळे जलसाठ्यात वाढ
म्हसवाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. शेतशिवारातून वाहत असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागाकडून २.७० मीटर उंच व ८.८६ मीटर लांबीच्या सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यातून पाणी साठवणुकीची क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. दुसऱ्या बंधाऱ्यातून पाणी साठवणूक क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी करण्यात येत आहेत. साठविलेल्या पाण्यापासून विहीरी व इतर जलाशयातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानामूळे व शेतातील डोलदार धानाच्या पिकाकडे पाहून शेतीच्या उत्पादनात यावर्षी निश्चित वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Farmers' Basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.