पावसाच्या तांडवाने शेतकरी रडकुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:08+5:30

गेल्या ८ दिवसांपासून परिसरात दरदिवशी वादळ वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असून परतीच्या पावसाने तांडव घातले आहे. हाताशी येणारे हलक्या जातीचे धानपीक मातीमोल होत आहेत. भारी (जड) जातीचे धान येणाऱ्या वाऱ्यामुळे झोपून गेले आहेत. त्यामुळे भारी जातीचे धान फोल होण्याची भिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी व मळणी करुन वाळत घातले असता धानावर पाणी जावून ओलेचिंब झाले.

Farmers are crying due to heavy rains | पावसाच्या तांडवाने शेतकरी रडकुळीस

पावसाच्या तांडवाने शेतकरी रडकुळीस

ठळक मुद्देधान पिकाचे नुकसान। भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : खरीप हंगामातील परिपक्व झालेल्या हलक्या धान पीकाची कापणी व मळणी या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र परतीच्या पावसाने घातलेल्या रोजच्या तांडवामुळे हलक्या धान पीकाचे अतोनात नुकसान केले आहे. हातामध्ये येणारे धान पीकाचे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत असल्याचे दिसून येत आहे. पावसाने होणाऱ्या धान पीक नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या ८ दिवसांपासून परिसरात दरदिवशी वादळ वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असून परतीच्या पावसाने तांडव घातले आहे. हाताशी येणारे हलक्या जातीचे धानपीक मातीमोल होत आहेत. भारी (जड) जातीचे धान येणाऱ्या वाऱ्यामुळे झोपून गेले आहेत. त्यामुळे भारी जातीचे धान फोल होण्याची भिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी व मळणी करुन वाळत घातले असता धानावर पाणी जावून ओलेचिंब झाले. त्यामुळे त्या धानावर काळीबुरशीजन्य परिस्थिती निर्माण होवून धानातून वास येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हलक्या जातीचे धान पीक विक्रीला दिले असते. परंतु अजूनही आदिवासी विकास महामंडळाचे धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. खाजगी व्यापाऱ्यांना विकल्यास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यापूर्वी वेळोवेळी बदलणाऱ्या निसर्गरम्य लहरीपणामुळे धानपीकावर तुडतुड, करपा, खोडकिडा या रोगांचा प्रार्दुभाव होवून धानपीक नष्ट झाले. पावसाने तांडव घालून या परिसरातील शेतकऱ्यांना रडकुळीस आणले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी पुरता घाबरला असून पावसाने केलेल्या नुकसानीचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 

Web Title: Farmers are crying due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.