शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावर होतेय शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हमालांकडून लुबाडणूक केली जात आहे.

ठळक मुद्देदिघोरी येथील प्रकार : हमाली दर घेतला जातो दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी मोठी : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर हमालांकडून शेतकºयाचे धान उतरविण्यासाठी लुट केली जात असल्याचा प्रकार सुरु आहे. लाखांदूर खरेदी-विक्री संघ आणिशेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हमालांकडून लुबाडणूक केली जात आहे.शासनाने प्रतिक्विंटल १५ रुपये हमाली घेण्याचे आदेश दिले असताना दिघोरी केंद्रावर मात्र शेतकऱ्यांकडून ३० रुपये प्रति क्विंटल दराने हमाली घेतली जात आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रार केली असता शेतकºयांंना अश्लिल शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार घडला आहे. जे शेतकरी तक्रार करतात त्यांचा धान हेतुपरस्परपणे उशीरा मोजला जातो. त्यांनाथांबवले जाते.शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत व दामदुप्पट दराने लुबाडणूक करुन हमाल गैरफायदा घेत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याबाबत खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अरुण गभने यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी याबाबत हमालांना विचारणा करणार असल्याचे सांगितले.हमालांना १५ रुपये प्रति क्विंटल दर शासनाने ठरवून दिला आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांकडून हमाली घेण्यात यावी, अशी अपेक्षा आहे. जर अधिक दराने शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असेल तर हमाल बदलले जातील.- अरुण गभने, उपाध्यक्षखरेदी-विक्री संघ, दिघोरी/मोठी

टॅग्स :Marketबाजार