शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार, सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली येथील घटना : तुरीच्या शेंगा तोडत असताना केला वाघाने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:52 IST

प्राप्त माहितीनुसार लक्ष्मी सयाम या शुक्रवारी दुपारी पतीसह स्वतःच्या शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही पती-पत्नी तुरी तोडण्यात व्यस्त असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक लक्ष्मी सयाम यांच्यावर झडप घातली.

राजेश मुनीश्वर/युवराज वालदे

सडक अर्जुनी : शेतात तुरी तोडण्याचे काम करीत असलेल्या मजूर महिलेवर दबा धरुन बसलेल्या वाघाने मागेहून हल्ला करुन ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) दुपारी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील माहुली येथे घडली. लक्ष्मी हेमराज सयाम (वय ६०) रा. माहुली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार लक्ष्मी सयाम या शुक्रवारी दुपारी पतीसह स्वतःच्या शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही पती-पत्नी तुरी तोडण्यात व्यस्त असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक लक्ष्मी सयाम यांच्यावर झडप घातली. यानंतर तिचा पती जोराने ओरडला. यामुळे आजबाजुच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी व मजूर धावून आले. त्यांना महिला वाघाच्या तावडीत सापडली असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने वाघाने महिलेला तिथेच सोडून घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र यात लक्ष्मी सयाम यांचा जागीच मृत्यूृ झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली शेतकऱ्यांनी लगेच याची माहिती सडक अर्जुनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व डुग्गीपार पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने प्रतिबंधात्मक कारवाई करीत वाघाचा शोध सुरू केला आहे.

घटनेनंतर गावकरी आक्रमकसडक अर्जुनी तालुक्यातील माहुली,सौंदड, बोपाबोडी, सुंदरी, चारगाव परिसरात एक महिन्यापासून एका पट्टेदार वाघाचा वावर आहे. अनेकांना मुख्य रस्त्यावर या वाघाचे यापुर्वी दर्शन झाले आहे. पंधरा दिवसांपुर्वी माहुली येथील दिपाचंद चौधरी या युवकावर वाघाने हल्ला करुन जखमी केले होते. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र पंधरा दिवसात पुन्हा वाघाने हल्ला करुन शेतकरी महिलेचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. घटननेंतर गावकऱ्यांनी आक्रमक होत वाघाचा त्वरीत बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर वन विभागाने वाघाला बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

महिलेच्या कुुटुंबीयांना त्वरित ५० हजारांची मदत

सौंदड सहवनक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक १६९ राखीव वनालगत असलेल्या शेतात लक्ष्मी हेमराज सयाम या महिलेचा वाघाचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून त्वरित ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच नियमानुसार २५ लाख रुपयांची मदत सुध्दा देण्यात येईल असे सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव छबूकांता भडांगे, वनक्षेत्र सहाय्यक युवराज राठोड यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger Attack: Farmer Killed in Sadak Arjuni While Harvesting

Web Summary : A farmer was killed in Mahuli, Sadak Arjuni, by a tiger while harvesting. Villagers are angry, demanding immediate action after previous attacks. The forest department has provided immediate financial assistance to the family.
टॅग्स :Tigerवाघ