जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:49 IST2018-09-29T21:49:05+5:302018-09-29T21:49:47+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणामार्फत (आत्मा) जिल्हा अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि.२७) पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते.

जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणामार्फत (आत्मा) जिल्हा अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि.२७) पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे होत्या. उद्घाटन सभापती अर्चना राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी एस.व्ही. भोसले, पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.एम. वºहाडपांडे, शेतकरी तुकाराम बोहरे, कृषी सहायक एस.टी. नागदेवे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी उपस्थित होते.याप्रसंगी भोसले यांनी, फळबाग लागवड योजना, सुक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे, यांत्रिकीकरण आदि योजनांबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. वºहाडपांडे यांनी, पावर पार्इंट प्रेजेन्टेशन द्वारे शेतकºयांना पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकश सांगीतले. तसेच पशुपालन हा दुय्यम व्यवसाय नसून मुख्य व्यवसाय आहे. याद्वारे आपण कशा प्रकारे योजनांचा लाभ घेवून आर्थिक स्थिती कशी सुधारता येते यावर माार्गदर्शन केले. बोहरे यांनी, शेतकºयांना सेंद्रिय शेतीचे महत्व, सेंद्रीय शेतीकरिता आवश्यक बाबी इ. विषयी मार्गदर्शन करुन सेंद्रीय शेती करा असे आवाहन केले. नागदेवे यांनी, भात पिकावर येणाºया रोग व किडींच्या नियंत्रण व उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. उपवंशी यांनी, उपस्थितांना सेंद्रीय शेती करिता शेतकºयांना प्रोत्साहित करावे असे कृषिमित्रांना सांगितले.
तसेच जैविक किड नियंत्रणाबाबत मागदर्शन केले. संचालन करून आभार अरविंद उपवंशी यांनी मानले. सदर कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ए.बी. नवरे, डी.व्ही. ठाकरे तसेच कृषी सहायक झेड.एम. कांबळे, ए.एस. पवार, आर.एम. कागदीमेश्राम, कृषी मित्र रतनलाल टेंभरे, वसंत पटले, किशोर वालदे, दिलीप टेकाम, आनंदराव खोटेले, अतुल पटले, विजय लांजेवार, प्रमिला बहेकार, गोविंद मरस्कोल्हे, कृषी सखी वनिता फुंडे, भूमिका चुटे, दुर्गा लिल्हारे, छाया पटले यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.