गोंदिया जिल्ह्यात विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:55 IST2020-05-21T18:54:54+5:302020-05-21T18:55:30+5:30
एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्त्या केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील वडद येथे गुरूवारी (दि.२१) दुपारी उघडकीस आली. गजानन दादू पारधी (६४) असे आत्महत्या करणाºया शेतकऱ्याचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्यात विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
गोंदिया : एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्त्या केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील वडद येथे गुरूवारी (दि.२१) दुपारी उघडकीस आली. गजानन दादू पारधी (६४) असे आत्महत्या करणाºया शेतकऱ्याचे नाव आहे.
गजानन पारधी हे १९ मे च्या रात्रीपासून घरुन बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने सालेकसा पोलीस स्टेशनला केली होती. पोलीस तपास सुरू असताना गुरूवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास गावाजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. याची माहिती लगेच सालेकसा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पारधी यांच्याकडे तीन एकर शेती असून मागील आठवडाभरापासून ते कसल्यातरी चिंतेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार राजकुमार डुणगे करीत आहेत.