फॅन्सी आयटम्सला जास्त पसंती

By Admin | Updated: October 26, 2016 02:31 IST2016-10-26T02:31:53+5:302016-10-26T02:31:53+5:30

दिवाळी म्हटली की फटाक्यांची खरेदी आलीच. जोरदार आवाज करणाऱ्या बम पासून तर विविध रंगांची उधळण करणाऱ्या रॉकेट व अनारचा यात हमखास समावेश असतोच.

Fancy items are preferred | फॅन्सी आयटम्सला जास्त पसंती

फॅन्सी आयटम्सला जास्त पसंती

ध्वनी व वायू प्रदूषण नको : भारतीय फटाक्यांची मागणी वाढली
कपिल केकत  गोंदिया
दिवाळी म्हटली की फटाक्यांची खरेदी आलीच. जोरदार आवाज करणाऱ्या बम पासून तर विविध रंगांची उधळण करणाऱ्या रॉकेट व अनारचा यात हमखास समावेश असतोच. आता मात्र लोकांचा कल जोरदार आवाज करणाऱ्या बम ला सोडून रंगांची उधळण करणाऱ्या रॉकेट व अनारके वाढला असल्याचे दिसून येत आहे. ध्वनी व वायू प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांचे आकर्षण लोकांना जास्त आहे.
प्रकाशाचा हा सण नव चैतन्य व महालक्ष्मीचे वरदान घेऊन येणारा असतो. यात नवे कपडे परिधान करून फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. एकंदर दिवाळीत फटाक्यांचाही तेवढाच मान आहे. विशेष म्हणजे महालक्ष्मीच्या पूजनात फटाकेही ठेवले जातात. यामुळे थोडेफार का असोना मात्र फटाक्यांची खरेदी केलीच जाते. आता यात सर्वांची आपली पसंती असते. कुणी मोठाले बम खरेदी करतात तर कुणी फँसी आयटम्स. मात्र फटाके प्रत्येकच घरात फोडले जातात.
मात्र बदलत्या काळानुसार आता लोकांच्या आवडीनिवडीही बदलत चालल्या आहेत. यामुळे फटाक्यांच्या या खरेदीतही लोकांची पसंती बदलत चालली आहे.
आज तरूण पिढीला लोकांच्या कानठळ््या बसणारे बम आवडत आहेत. त्यामुळे ते लहान-सहान आवाज करणारे फटाके सोडून फक्त मोठे बम खरेदी करतात. तर तारूण्याची पायरी ओलांडलेले मात्र ध्वनी व वायू प्रदूषण नको म्हणत फक्त फँ सी आयटम्सलाच पसंती देत आहेत. लोकांना दणाणून सोडण्या पेक्षा रंगांची उधळण करणारे फटाके त्यांना जास्त आवडत असून पर्यावरणाशी जोड घालणारे फटाके फोडण्याकडे त्यांचा कल जास्त दिसून येत आहे.

चायना आयटम्सला डच्चू
सध्या चायना आयटम्सचा बायकॉट करण्याची एक चळवळच देशात सुरू आहे. परिणामी मागच्या वर्षापर्यंत धूम माजवणाऱ्या चायना आयटम्सला यंदा डच्चू देण्यात आला आहे. फ क्त देशात तयार झालेलेच फटाके लोक मागत असल्याचे फटाके विक्रेता सांगत आहेत. स्वस्त का असोना मात्र चायना आयटम्स नकोच असा पवित्रा लोकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Fancy items are preferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.