शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:48 IST

यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अंदाज वर्तविला जात होता. जिल्हा परिषद कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात ६२ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देपडीक क्षेत्रावरुन संभ्रम : समन्वयाचा अभाव, कृषी विभागाचा घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अंदाज वर्तविला जात होता. जिल्हा परिषद कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात ६२ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्याचे म्हटले आहे. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ४७ हजार हेक्टर क्षेत्र पावसाअभावी पडीक असल्याचा अहवाल पाठविला. दरम्यान पडीक क्षेत्रावरुन कृषी विभागातच समन्वय नसल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ अर्धाच पाऊस झाला. त्यातही सातत्य नसल्याने शेतकºयांना रोवणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ७० हजार हेक्टरवर पावसाअभावी रोवणी झाली नसल्याचा अहवाल जिल्हा परिषद कृषी विभागाने तयार केला होता. सप्टेंबर महिन्यात देखील समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी केलेली रोवणी वाचविण्यासाठी शेतकºयांना मोठी धडपड करावी लागली.जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाच्या रोवणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. पण, यंदा सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने हजारो हेक्टरमधील रोवणी झाली नाही. शेतकºयांना शेती पडीक ठेवण्याची वेळ आली.एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. सर्वच राजकीय पक्ष आणि शेतकºयांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्याच पार्श्वभूमिवर शासनाने कृषी विभागाला जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी, झालेली रोवणी, पडीक क्षेत्र यांचा अहवाल मागविला होता. त्यानुसार नुकताच या विभागाने शासनाला अहवाल पाठविला.जिल्हा परिषद कृषी विभागाने पावसाअभावी जिल्ह्यात ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अहवाल तयार करुन पाठविला. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ४७ हजार हेक्टरवर रोवणी झाली नसल्याचे म्हटले आहे. एकाच जिल्ह्यातील कृषी विभागाने पाठविलेल्या दोन अहवालातील आकडेवारीमध्ये तफावत आहे.त्यामुळे नेमके पडीक क्षेत्र किती, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान या दोन्ही विभागातील समन्वयचा अभावाचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. शेतकºयांना शासनाकडून दिल्या जाणाºया नुकसान भरपाईवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.सदस्यांनी धरले अधिकाºयांना धारेवरपावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे. मात्र यानंतरही कृषी विभाग शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर नाही. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात केवळ ४७ हजार हेक्टवर रोवणी न झाल्याचा अहवाल शासनाला पाठविला. हा अहवाल कार्यालयात बसून तयार केला. प्रत्येक्षात शेतावर जावून पाहणी केली नाही. यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करित जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्यासह अन्य सदस्यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरल्याची माहिती आहे.परतीच्या पावसाचा पिकांना फटकाजिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका पिकांना बसला. या पावसाने हलक्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल शासनाला पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.