डोळ्याच्या ९२ शस्त्रक्रिया

By Admin | Updated: May 8, 2016 01:35 IST2016-05-08T01:35:54+5:302016-05-08T01:35:54+5:30

गरजू, गरिबांसाठी वरदान ठरणारी लाइफ लाईन एक्सप्रेस मध्ये उपचार करण्यासाठी ५ मे पासून नेत्ररोगाच्या २६० रूग्णांनी नोंद केली आहे.

Eye Surgery 9 82 | डोळ्याच्या ९२ शस्त्रक्रिया

डोळ्याच्या ९२ शस्त्रक्रिया

२५ मे पर्यंत राहणार: २६० नेत्र रूग्णांची नोंदणी
गोंदिया : गरजू, गरिबांसाठी वरदान ठरणारी लाइफ लाईन एक्सप्रेस मध्ये उपचार करण्यासाठी ५ मे पासून नेत्ररोगाच्या २६० रूग्णांनी नोंद केली आहे. त्यांच्यावर (दि.६ व ७) रोजी मोतियाबिंदूच्या ९२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका दिवशी जास्तीत जास्त डोळ्याच्या ६० शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले होते. ६ रोजी ५५ तर ७ रोजी ३७ रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
लाइफ लाईन एक्सप्रेस मध्ये उपचार करण्यासाठी विविध आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी नोंदणी व शस्त्रक्रिया करण्याच्या तारखा ठरविण्यात आल्या आहेत.५ ते ७ मे दरम्यान डोळ्यांचे परीक्षण, ६ ते १२ मे दरम्यान डोळ्यांचे मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, १३ व १४ मे रोजी फाटलेल्या ओठांचे परीक्षण व उपचार तर १४ ते १६ मे दरम्यान त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
१७ ते १९ मे दरम्यान कानाचे विकार परीक्षण तर १८ ते २४ मे दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १३ व १४ मे रोजी पोलीओ परीक्षण तर १४ ते १६ दरम्यान पोलीओ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १७ ते २३ मे दरम्यान दातांचे परीक्षण व उपचार तर १३ ते १६ मे दरम्यान महिलांचे स्तन, गर्भाशय, ग्रीवा कर्करोग परीक्षण व त्यावर उपचार केला जाणार आहे. डोळ्यांची शस्त्रक्रिया मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील डॉ.धर्मेंद्र सिंग, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉ.चंद्रशेखर पारधी, डॉ. अनिता पोयाम, डॉ. स्रेहल कोकोडे हे करणार आहेत. ४२० रूग्णांच्या मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु दोन दिवसात पाहिजे त्या प्रमाणात नोंदणी झाली झाली नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Eye Surgery 9 82

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.