सोनी येथे ६०० रुग्णांची नेत्र तपासणी
By Admin | Updated: May 11, 2014 23:53 IST2014-05-11T23:53:13+5:302014-05-11T23:53:13+5:30
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी अधिकारी गोरेगाव, महात्मे नेत्रपेढी रुग्णालय नागपूर एम.आय. पटेल हायस्कूल व कनिष्ठ महा.

सोनी येथे ६०० रुग्णांची नेत्र तपासणी
गोंदिया : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी अधिकारी गोरेगाव, महात्मे नेत्रपेढी रुग्णालय नागपूर एम.आय. पटेल हायस्कूल व कनिष्ठ महा. सोनी व डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल हॉस्पिटल खजरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोनी येथील शाळेत आयोजित नेत्र तपासणी शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील १०० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. एम.आय. पटेल हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय सोनी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मे नेत्रपेढी नागपूरचे डॉ.एन.डी. झाडे, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. विवेक मेंढे, प्रमुख अतिथी म्हणून चक्रधर बहुउद्देशीय संस्थेचे सहसचिव विशाल शेंडे व विकास संस्था गोंदिया डॉ. पी.जी. डहाके, डॉ. अरविंद डोंगरवार, तालुका कृषी अधिकारी एफ.ए. वावधने, मंडळ कृषी अधिकारी वाघाये, वाजपेयी, पी.एस. मेंढे, शिबिर समन्वयक महात्मे नेत्रपेढी रुग्णालय नागपूर मोहन खराबे, एम.आय. पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.टी. पटले, प्रितमलाल पटले, कैलाश बिसेन, एम.एल. नाईक, भोजू पटले परिसरातील शाळेतील सर्व कर्मचारी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. रूग्णांची नेत्र तपासणी करून मोफत औषधी व चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी १०० नागरिकांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया महात्मे नेत्रपेढी रुग्णालय नागपूर येथे मोफत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.डी. झाडे उद्घाटक डॉ. विवेक मेंढे व प्रमुख अतिथी चक्रधर बहुउद्देशीय शिक्षण व विकास संस्थेचे सहसचिव विशाल शेंडे यांनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रोशन रंगारी व आभार प्रमोद ठाकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)