Extra 300 rounds for travel convenience | प्रवासी सुवधेसाठी अतिरिक्त ३०० फेऱ्या
प्रवासी सुवधेसाठी अतिरिक्त ३०० फेऱ्या

ठळक मुद्देगोंदिया आगाराचे दिवाळी नियोजन : २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी परतणाºया प्रवाशांची सुविधा व्हावी म्हणून राज्य परिवहन मंडळाकडून बस फेºया वाढविल्या जातात. त्यानुसार, गोंदिया आगाराकडून यंदा अतिरीक्त ३०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहचण्यात सोय होणार असून शिवाय परिवहन मंडळाचे उत्पन्न ही वाढणार आहे.
हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर वर्गाचे सर्वात जास्त प्रमाण असते. हेच कारण आहे की, दिवाळी आता तोंडावर आली असतानाच मजुरांचे जत्थे आपल्या गावी परतू लागले आहेत. अशात कित्येकदा त्यांना आपल्या गावी पोहचण्यासाठी वाहनांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. शिवाय खाजगी वाहनांतून धोक्याचा प्रवास करावा लागतो.
हीच बाब हेरून व प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया आगाराने यंदा अतिरीक्त ३०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे. आता शाळांना सुट्या लागणार असून अशात मानव विकासच्या बसेस मोकळ््या राहतील. दिवाळीच्या या नियोजनात या बसेस अस आगारातील अन्य बसेसला घेऊन हे ३०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ५ दिवसांच्या दिवाळीनंतरही आणखी ५-६ दिवस दिवाळीची रंगत असते व या काळात प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत या फेºयांचे नियोजन करण्यात आले आहे.

बसेसमध्ये वाढली आतापासूनच गर्दी
बाहेरगावी कमविण्यासाठी गेलेला मजूरवर्ग आता परत येत असताना दिसत असून रेल्वे सह बसस्थानकांवर त्यांचे जत्थे बघावयास मिळत आहेत. रेल्वेने मार्गावरील स्थानकांपर्यंतचा प्रवास होत असला तरिही आत असलेल्या गावात जाण्यासाठी बसेस हाच पर्याय आहे. परिणामी बसेस प्रवाशांनी भरभरून जात असल्याचे दिसत आहे. आता हे चित्र असताना दिवाळीच्या काळात ही गर्दी आणखी वाढणार यात शंका नाही.


Web Title: Extra 300 rounds for travel convenience
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.