बाहेरून आलेल्यांची तपासणी व चौकशी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:33+5:30

अलिकडेच बाहेरील राज्यातून बरेच नागरीक आले आहे. गोरेगाव शहरासह अनेक भागात बाहेरून आलेल्या नागरीकाविषयी सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव शहरात बाहेरील राज्यातून किती लोकं आले आहे. याचा आकडाच नाही. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात तीन दिवसांपूर्वी आलेल्या काही कुटूंब आणि शिक्षणासाठी गेलेल्या युवकाची साधी आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याविषयी नगर पंचायतकडून माहीती घेतली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही.

External inspection and inquiry are not required | बाहेरून आलेल्यांची तपासणी व चौकशी नाहीच

बाहेरून आलेल्यांची तपासणी व चौकशी नाहीच

ठळक मुद्देकोरोनाची दहशत : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यात बाहेरील राज्यातून बरेच नागरीक परत आले आहे. काही शिक्षण घेण्यासाठी गेले होते तर काही रोजगारासाठी. मात्र स्थानिक प्रशासनाने यांची साधी तपासणी किंवा चौकशी केली नाही. बाहेरील राज्यातून गोरेगाव येथे परतणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलिकडेच बाहेरील राज्यातून बरेच नागरीक आले आहे. गोरेगाव शहरासह अनेक भागात बाहेरून आलेल्या नागरीकाविषयी सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव शहरात बाहेरील राज्यातून किती लोकं आले आहे. याचा आकडाच नाही. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात तीन दिवसांपूर्वी आलेल्या काही कुटूंब आणि शिक्षणासाठी गेलेल्या युवकाची साधी आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याविषयी नगर पंचायतकडून माहीती घेतली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही. याविषयी सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी नगर पंचायत प्रशासनाने सायंकाळी उशिरापर्यंत शहरात दवंडी देत बाहेरील राज्यातून आलेल्या नागरीकांविषयी माहीती देण्याचे आवाहन केले असले तरी भितीपोटी कुणीही माहिती द्यायला पुढे आलेले नाही. ज्या ज्या वॉर्डात बाहेरील राज्यातून नागरीक आले आहे. त्या-त्या वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता तालुक्यात कोरोना दहशत असताना जमावबंदी संचारबंदी कायदा अंमलात आणण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव पोलीस स्टेशन अतंर्गत ७३ गावे येतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत गोरेगाव पोलीस स्टेशन येथे ४५ कर्मचारी कार्यरत आहेत.यापैकी काही कर्मचारी रात्रपाळीत गस्तीवर काही रजेवर तर काही दैनंदिन कामात व्यस्त राहतात. अशा वेळी उरलेल्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण भार येतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यात नागरिकही तेवढेच दोषी आहेत.पोलीस नागरिकांसाठी झटत आहे ही भावना नागरिकांना अद्यापही लक्षात येत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: External inspection and inquiry are not required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.