विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:16+5:302021-09-11T04:29:16+5:30

जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर सन २०१९-२० साठी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर ...

Extension for students to fill up scholarship applications | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर सन २०१९-२० साठी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर व सन २०२-०-२१करिता नवीन अर्ज भरण्यास ३०

सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोविड-१९ संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नसून शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज सादर केले

नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

नागपूर विभागातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावयाचे आहेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.

Web Title: Extension for students to fill up scholarship applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.