शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:19 IST2017-09-15T22:19:08+5:302017-09-15T22:19:24+5:30

महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यांनी घेतलेला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे.

Extend information about government schemes to the public | शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा

शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा

ठळक मुद्देराष्ट्रीय महासचिव पांडे यांचे आवाहन : भाजपा पदाधिकाºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यांनी घेतलेला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असून अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. यासर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्टÑीय महासचिव व महाराष्टÑ प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी केले.
येथील रु प रिसोर्ट येथे गुरूवारी (दि.१४) आयोजित भाजपाच्या जिल्हा प्रमुख पदाधिकाºयांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार अशोक नेते, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आ. केशवराव मानकर, भेरसिंग नागपूरे, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडा न.प अध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर उपस्थित होते.
पांडे म्हणाल्या, मी एका छोट्या कार्यकर्त्यापासून इथपर्यंत पोहचली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाने दिलेल्या जबाबदारी प्रमाणे कार्य करून संघटन बळकट करणे अपेक्षित आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श बाळगावा. हे पदाधिकारी सतत कार्य करीत असतात. केंद्र शासनाकडून नोटबंदी, जीएसटी यासारखे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. परंतु विरोधक टिका करुन जनतेची दिशाभूल करतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने विरोधकाच्या टिकेला जबाबदारीने उत्तर देताना जनतेमध्ये शासनाच्या योजनांची माहिती पोहचिवण्याचे आवाहन केले.
या वेळी त्यांनी जिल्हा, मंडळ व आघाड्यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्र माची माहिती दिली.

Web Title: Extend information about government schemes to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.